News Flash

जान्हवी कपूरच्या बिकिनी लूकपेक्षा सोबत असलेल्या मिस्ट्री मॅनची चर्चा

जान्हवीचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

जान्हवीचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जान्हवी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत जान्हवी चाहत्यांच्या संपर्कात राहते. जान्हवीने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यापैकी एका फोटोत जान्हवी सोबत एक ‘मिस्ट्री मॅन’ आहे. हा मिस्ट्री मॅन कोण आहे? असा प्रश्न जान्हवीच्या चाहत्यांना पडला आहे.

आणखी वाचा : सलमानने नकारलेल्या ‘या’ चित्रपटांमुळे शाहरुख झाला रातोरात स्टार, जाणून घ्या चित्रपटांविषयी

हे फोटो जान्हवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. फोटोत जान्हवीने बिकिनी परिधान केली आहे. एका फोटोमध्ये जान्हवी आहे. जान्हवी समुद्राच्या किनाऱ्यावर असून ती पोज देताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत जान्हवी एका ‘मिस्ट्री मॅन’ सोबत दिसत आहे. हे फोटो शेअर करत “त्या प्रत्येक धुसर सुर्यास्ताचं सौदर्य क्षणभंगुर असतं”, अशा आशयाचे कॅप्शन जान्हवीने दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

तर जान्हवीच्या चाहत्यांसमोर असलेला प्रश्न म्हणजे हा ‘मिस्ट्री मॅन’ कोण आहे? या ‘मिस्ट्री मॅन’चे नाव ओरहान अवत्रामनि असे आहे. ओरहान हा बॉलिवूडमधील न्यू जनरेशच्या अनेक कलाकारांचा बेस्ट फ्रेन्ड आहे. ओरहान हा जान्हवी कपूर, सारा अली खान, इब्राहिम अली खान, अनन्या पांडे, शनाया कपूर यांचा खूप चांगला मित्र आहे. या सगळ्यां सोबत ओरहानचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ओरहान हा मुंबईतच राहतो. तो कोलंबिया विद्यापीठात साराचा क्लासमेट होता. ओराहन अॅनिमेशन क्षेत्रात करिअर करण्याचे प्रशिक्षण घेत आहे.

आणखी वाचा : Indian Idol 12: ‘प्रत्येकवेळी ड्रामा करणं बंद करा’, नेहा कक्कर आणि हिमेश रेशमीया झाले ट्रोल

 

View this post on Instagram

 

A post shared by Orhan Awatramani (@orry1)

 

View this post on Instagram

 

A post shared by Orhan Awatramani (@orry1)

 

View this post on Instagram

 

A post shared by Orhan Awatramani (@orry1)

 

View this post on Instagram

 

A post shared by Orhan Awatramani (@orry1)

दरम्यान, जान्हवीचा ‘रुही’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटात जान्हवीसोबत राजकुमार राव आणि वरुण शर्मा मुख्य भूमिकेत आहेत. ‘रुही’ हा हॉरर कॉमेडी चित्रपट असून दिनेश विजय यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या आधी त्यांनी ‘स्त्री’ या हॉरर कॉमेडी चित्रपटाची निर्मिती केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2021 7:06 pm

Web Title: janhvi kapoor shares bikini photos but everyone is after the mystery man orhan awatramani dcp 98
Next Stories
1 VIDEO: संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तचा ‘वर्कआउट मोड’ ; फॅन्ससह सेलिब्रिटींकडून कौतुकाचा वर्षाव
2 Video: नवा शो, नवे प्रोजेक्ट्स आणि बरच काही..; अभिनेता अभिजीत खांडकेकरशी दिलखुलास गप्पा
3 शमा सिकंदरच्या न्यूड फोटोचा सोशल मीडियावर धुमाकुळ; सनी लिओनीची केली कॉपी
Just Now!
X