19 April 2019

News Flash

महिला वैमानिक साकारण्यास जान्हवी सज्ज ?

जान्हवी बॉलिवूडमध्ये सक्रिय झाल्यापासून तिच्याकडे चित्रपटांची रांग लागल्याचं पाहायला मिळत आहे.

जान्हवी कपूर, Janhvi Kapoor

बॉलिवूडची नवोदित अभिनेत्री जान्हवी कपूरने नुकतंच ‘धडक’ या चित्रपटातून चंदेरी दुनियेमध्ये पदार्पण केलं आहे. या चित्रपटामध्ये झळकण्यापूर्वीच जान्हवीला लोकप्रियता मिळाली आहे. तिच्या याच लोकप्रियतेमुळे आता ती ‘तख्त’ या चित्रपटामध्येही झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटानंतर पुन्हा एकदा करणच्या धर्मा प्रोडक्शनमध्ये तयार होणारा नव्या चित्रपटामध्येही झळकण्याची संधी जान्हवीला मिळाली आहे.

‘पिंकव्हिला’नुसार, जान्हवी बॉलिवूडमध्ये सक्रिय झाल्यापासून तिच्याकडे चित्रपटांची रांग लागल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे ती लवकरच एका महिला वैमानिकाच्या भूमिकेमध्ये झळकणार आहे. करणचा आगामी चित्रपट महिला वैमानिक लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांच्या जीवनावर आधारित असल्याचं सांगण्यात येत आहे.

निर्माता -दिग्दर्शक करण जोहर गुंजनची प्रोत्साहनपर शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर आणण्यासाठी सज्ज झाला आहे. कारगिल युद्धात गुंजन फ्लाईट लेफ्टनंट श्रीविद्या राजनसोबत लढाऊ विमान उडवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. कारगिल युद्धात पाकिस्तानी सैन्यदलाकडून भारतीय सैनिकांवर निशाणा साधण्यात येत होता. त्या भागातूनच गुंजन यांनी लढाऊ विमान उडवत सैन्यदलातील जवानांना सुरक्षितरित्या बाहेर काढले होते. त्यामुळे त्यांची ही साहसाची गाथा करण त्याच्या आगामी चित्रपटामध्ये मांडणार आहे. विशेष म्हणजे जान्हवी गुंजन यांच्या भूमिकेमध्ये झळकणार आहे.

दरम्यान, पहिल्यांदा जान्हवी एका धाडसी महिलेची भूमिका साकारणार असून तिला या भूमिकेमध्ये पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे. धडकमध्ये जान्हवीने वठविलेली भूमिका आणि करणच्या या आगामी चित्रपटातील भूमिका पूर्णपणे वेगळी असल्यामुळे जान्हवीला अथक परिश्रम करावे लागणार असल्याच एकंदरीत दिसून येत आहे.

First Published on September 6, 2018 6:54 pm

Web Title: janhvi kapoor signed dharma productions film which is based on the life of gujan saxena