28 February 2021

News Flash

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार करण जोहरचा ‘गुंजन सक्सेना’

चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीक अद्याप सांगण्यात आलेली नाही.

बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहरचा ‘गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी चर्चेत होता. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

नेटफ्लिक्स इंडियाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटद्वारे ही घोषणा केली आहे. ‘विमान मुलाने उडवले किंवा मुलीने उडवले त्या दोघांनाही वैमानिकच म्हणतात. गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच त्यांनी ट्विटमध्ये गुंजन सक्सेना यांच्या जीवनावर आधारित एक व्हिडीओ शेअर केला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीक अद्याप समोर आलेली नाही.

गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल या चित्रपटात जान्हवी कपूरसह पंकज त्रिपाठी, अंगद बेदी, विनीता कुमार आणि मानव विज हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण शर्मा करत आहेत. अंगद चित्रपटात जान्हवीच्या भावाच्या भूमिकेत दिसणार आहे.

कारगिल युद्धात गुंजन फ्लाईट लेफ्टनंट श्रीविद्या राजनसोबत लढाऊ विमान उडवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. कारगिल युद्धात पाकिस्तानी सैन्यदलाकडून भारतीय सैनिकांवर निशाणा साधण्यात येत होता. त्या भागातूनच गुंजन यांनी लढाऊ विमान उडवत सैन्यदलातील जवानांना सुरक्षितरित्या बाहेर काढले होते. त्यामुळे त्यांच्या साहसाची गाथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

पहिल्यांदा जान्हवी एका धाडसी महिलेची भूमिका साकारणार असून तिला या भूमिकेमध्ये पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘धडक’मध्ये जान्हवीने वठविलेली भूमिका आणि करणच्या या आगामी चित्रपटातील भूमिका पूर्णपणे वेगळी असल्यामुळे जान्हवीला या भूमिकेसाठी फार मेहनत घ्यावी लागली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2020 1:16 pm

Web Title: janhvi kapoor starrer gunjan saxena the kargil girl to premiere on netflix avb 95
Next Stories
1 खोल समुद्रात पोहतानाचा कतरिनाचा व्हिडीओ व्हायरल
2 “सोनू सूद लोकांना घरी पोहोचवतोय मग आपण कुठे कमी पडतोय?”; जितेंद्र जोशीला पडला प्रश्न
3 एकताने तिचा पद्मश्री पुरस्कार परत द्यावा, त्या वादावरुन हिंदुस्तानी भाऊची मागणी
Just Now!
X