बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूर आता बॉलिवूडमध्ये हळूहळू रुळू लागली आहे. त्यामुळे ती तिच्या लूककडे विशेष लक्ष देत असल्याचं पाहायला मिळतं. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलीच्या ईशाच्या साखरपुड्यामध्ये जान्हवीने परिधान केलेल्या कपड्यांची आणि एकंदरीतच तिच्या ड्रेसिंग सेन्सची चांगलीच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘टाईम्स नाऊ’नुसार, जान्हवीने नुकतंच ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली असून आपल्या आईप्रमाणेच तीदेखील चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक लहानसहान गोष्टींची चर्चा चाहत्यांमध्ये होत असते. यामध्येच तिच्या शूजची चर्चा सध्या रंगल्याचं दिसून येत आहे.

ईशा साखरपुड्यासाठी गेलेल्या जान्हवीला आणि खुशीला नुकतंच विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. यावेळी जान्हवीने डेनिमची फ्लेयर्ड जीन्स आणि स्नीकर्स घातले होते. विशेष म्हणजे जान्हवीने घातलेल्या या स्नीकर्सची किंमत तब्बल ७१ हजार ८०० रुपयांपेक्षा अधिक असून टी शर्टची किंमत ६३ हजार रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, यापूर्वीही जान्हवीच्या महागडे कपडे आणि शूजची चर्चा झाली होती. काही दिवसापूर्वी अर्जुनच्या घरी गेलेल्या जान्हवीने घातलेला ड्रेसही तब्बल १ लाख ५० हजार रुपयांचा असल्याचं समोर आलं होतं.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Janhvi kapoor wears 71 thousand rupees sneakers
First published on: 25-09-2018 at 11:34 IST