News Flash

श्रीदेवी यांची साडी नेसून लेकीने स्वीकारला राष्ट्रीय पुरस्कार

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतरही त्यांच्या आठवणी अजूनही कायम आहेत.

जान्हवी कपूर

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतरही त्यांच्या आठवणी अजूनही कायम आहेत. श्रीदेवी यांनी प्रत्येक चित्रपटातून, प्रत्येक भूमिकेतून आपली वेगळी छाप सोडली आहे. त्यांच्या याच कार्याची आणि ‘मॉम’ चित्रपटातील कामगिरीची दखल घेत त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. श्रीदेवी यांच्या निधनानंतरचा हा सन्मान स्वीकारण्यासाठी पती बोनी कपूर आपल्या दोन्ही मुलींसह दिल्लीत दाखल झाले होते. यावेळी जान्हवीने श्रीदेवी यांची साडी परिधान केल्याचं पाहायला मिळालं.

नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात जान्हवीने श्रीदेवी यांची साडी परिधान केली होती. प्रसिद्ध सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने इन्स्टाग्रामवर जान्हवीचा फोटो पोस्ट करत ही माहिती दिली. ‘श्रीदेवी यांच्या खासगी कलेक्शनमधील ही साडी जान्हवीने आज परिधान केली. अत्यंत भावूक आणि तितकाच मौल्यवान क्षण..,’ अशा शब्दांत मनिषने त्याच्या भावना व्यक्त केल्या.

वाचा : आधी नकार देत अखेर मराठी कलाकारांनी स्वीकारला राष्ट्रीय पुरस्कार 

जान्हवीची धाकटी बहिण खुशी कपूरसुद्धा यावेळी पारंपरिक वेशभुषेत दिसली. खुशीने परिधान केलेला दाक्षिणात्य पद्धतीचा लेहंगा अनेकांना श्रीदेवी यांची आठवण करून देत होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 7:38 pm

Web Title: janhvi kapoor wears sridevi saree to receive late mothers best actress national film award
Next Stories
1 Throwback Thursday : आपण यांना ओळखलंत का?
2 का आली दिशावर ट्रोल होण्याची वेळ?
3 ‘छोटी मालकीण’मध्ये वर्षा दांदळेची धमाकेदार एण्ट्री
Just Now!
X