जान्हवी कपूर ही तिचा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रसिद्धचा एक एक टप्पा पार करताना दिसत आहे. अर्थात ती सेलिब्रिटी किडही आहेच म्हणा. तिच्या अनेक लहानसहान गोष्टी जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. तिचा फॅशन सेन्स, कपडे, राहणीमान या साऱ्याबद्दल कमालीचं कुतूहलही चाहत्यांमध्ये पाहायला मिळतं.

नुकतीच जान्हवी गुलाबी रंगाच्या टी-शर्टमध्ये पाहायला मिळाली. ‘गुची’ या लक्झरी ब्रँडचं फिकट गुलाबी रंगाचं टी-शर्ट, डेनिम जीन्स, लेदरचे लोफर्स अशा जान्हवीच्या ‘कॅज्युअल स्टाइल’ची खूपच चर्चा झाली. कमी मेकअप आणि सिंपल सोबर लूक यामुळे तिची ही स्टाइल अनेकांना आवडली. वरकरणी तिनं परिधान केलेलं गुलाबी रंगाचं टीशर्ट सिंपल सोबर जरी दिसत असलं तरी त्याची किंमत ऐकून मात्र एखाद्याला प्रचंड धक्का बसेल. ‘गुची’च्या या फिक्कट गुलाबी रंगाच्या टी-शर्टची किंमत ई-कॉमर्स साइटवर जवळपास १ हजार युएस डॉलर म्हणजे भारतीय मुल्याप्रमाणे ६७ हजांराहूनही अधिक आहे.

 

जान्हवी कपूर