‘बिग बॉस’ हा छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय शो म्हणून ओळखला जातो. हा रिअॅलिटी शो सुरु होऊन आता आठ आठवडे उलटून गेले आहेत. परिणामी शो शेवटच्या टप्प्यात आलेला असतानाच प्रत्येक स्पर्धक ‘बिग बॉस’मध्ये टिकून राहण्यासाठी अटीतटीचा प्रयत्न करताना दिसत आहेत. या प्रयत्नांचं रुपांतर अनेकदा भांडणामध्ये देखील होतं.

अवश्य पाहा – ‘शेतकरी पिझ्झा का खावू शकत नाही?’; ट्रोलर्सला स्वरा भास्करचा संतप्त सवाल

असाच एक प्रयत्न सुरु असताना अभिनेत्री जॅस्मिन भसीन हिने शोमधील काही स्पर्धकांची तुलना चक्क सरकारी शाळांशी केली. “ज्या प्रमाणे सरकारी शाळा बेशिस्त असतात तसेच काही स्पर्धक बेशिस्त आहेत.” असं ती म्हणाली. मात्र या वादग्रस्त विधानामुळे तिच्यावर सध्या जोरदार टीका केली जात आहे. जॅस्मिनला शोमधून बाहेर काढा अशी मागणी काही संतापलेले प्रेक्षक करत आहेत.

अवश्य पाहा – “हॅण्डल विथ केअर नाहीतर…”; स्ट्रिपलेस फोटो शेअर करत क्रितीने दिला इशारा

अखेर वाढत्या टीकेनंतर जॅस्मिननं देखील या संतापलेल्या प्रेक्षकांची माफी मागितली आहे. “मला सरकारी शाळांचा अपमान करायचा नव्हता. माझ्या विधानामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्यांची माफी मागते. माझी आजी, आई, वडिल शिवाय कुटुंबातील अनेक सदस्य सरकारी शाळांमध्येच शिकून मोठे झाले आहेत. मला देखील सरकारी शाळांचा अभिमान आहे.” अशा आशयाचं वक्तव्य करत तिने संतापलेल्या प्रेक्षकांची माफी मागितली.