करोनाचे काळे ढग गेल्या वर्षभरापासून जायचं नाव नाही घेत आहेत. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या ही वाढतं आहे. करोनाच्या विळख्यात सर्वसामान्य जनतेपासून कलाकारांपर्यंत सगळेच अडकले आहेत. लोकांना ऑक्सिजन, बेड आणि औषधांसाठी इकडेतिकडे भटकावे लागतं आहे. या परिस्थितीचा सामना छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जॅस्मिन भसीनने देखील केला होता. जॅस्मिनने त्याचा अनुभव सांगितला आहे.

जॅस्मिन सोशल मीडियावर सक्रिय असून तिने ट्वीट करत तिचे मत मांडले आहे. जॅस्मिनचे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. “निराश आणि दुखी. दररोज मृत्यु, ऑक्सिजन आणि बेड्सच्या शोधात रस्त्यावर फिरणारे लोकं. दोन दिवसांआधी माझी स्वत:ची आई या परिस्थितीमध्ये होती, ज्यावेळी बेड शोधणे खूप कठीण काम होते. माझे वयस्कर वडील तिच्यासाठी वैद्यकीय सेवा शोधण्यासाठी इकडे तिकडे धावत होते, अनेक लोकांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागतं आहे,” असे ट्वीट जॅस्मिनने केले.

जॅस्मिन इथेच थांबली नाही तर तिने आणखी एक ट्वीट केले आहे. जॅस्मिन पुढे म्हणाली, “लोक त्यांचे प्रियजन आणि त्यांच्या कुटुंबाला गमावत आहेत. आम्ही कोणाला दोष दिला पाहिजे? आपली सिस्टम फेल झालीये?”

‘बिग बॉस’च्या १४ व्या पर्वात जॅस्मिन एक स्पर्धेक होती. जॅस्मिन तिच्या बॉयफ्रेंड अभिनेता अली गोणीमुळे सतत चर्चेत असते. त्या दोघांच नुकतच गाणं देखील प्रदर्शित झालं होतं. या दोघांनी आधी त्यांच्या रिलेशनशिपबद्दल कोणालाही सांगितले नव्हते. मात्र, बिग बॉसच्या घरात आल्यानंतर त्यांच्यात असलेल प्रेम हे प्रेक्षकांना दिसू लागले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या रिलेशनशिपची कबूली दिली.