26 September 2020

News Flash

ऑस्कर विजेता मेकअपमॅन ‘या’ भारतीय बायोपिकला देणार ‘गोल्डन टच’

जेसन कॉलिन्स हे हॉलिवूड सिनेसृष्टीतील अत्यंत महागडे मेकअप आर्टिस्ट आहेत.

कंगना रणौतचा जयललितांवरील चरित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. आर्थिक टंचाईमुळे या चित्रपटाचे चित्रीकरण रोखण्यात आले होते. परंतु आता मात्र, चित्रपटाचे निर्माता विष्णू इंदूरी यांनी एक नवीनच घोषणा केली आहे. त्यांनी कंगनाला जयललिता बनवण्यासाठी चक्क ऑस्कर पुरस्कार विजेता जेसन कॉलिन्स यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

चित्रपटाचे निर्माता विष्णू इंदूरी यांनी ट्विटरच्या माध्यातून याबाबत माहिती दिली. “कंगना या चित्रपटात चार वेगवेगळ्या लुक्समध्ये दिसणार आहे. तसेच या लुक्समध्ये दर्जेदारपणा आणण्यासाठी आम्ही कॅप्टन मार्व्हल फेम जेसन कॉलिन्स यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.” असे ट्विट विष्णू इंदूरी यांनी केले आहे. तसेच कंगनाची बहीण रंगोली रणौत हीने देखील आपल्या इन्स्टाग्राम पेजवरुन तिची बहीण हॉलिवूडला जात असल्याची माहिती दिली.

जेसन कॉलिन्स कोण आहे?

जेसन कॉलिन्स हे हॉलिवूड सिनेसृष्टीतील अत्यंत महागडे व नामांकीत मेकअप आर्टिस्ट आहेत. त्यांनी आजवर द डेड वन्स, अनफ्रेंडेड डार्क वेब, कॅप्टन मार्व्हल, ब्लॅक पँथर यांसारख्या अनेक ऑस्कर विनिंग चित्रपटांमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केले आहे. तसेच ‘द अमेरिकन हॉरर स्टोरी’ या चित्रपटासाठी त्यांना ऑस्कर पुरस्कार देखील मिळाला आहे. अगदी काल परवा आर्थिक टंचाईमुळे चित्रपटाचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले होते आणि आता इतक्या मोठ्या ऑस्कर पुरस्कृत कलाकाराचे चित्रपटात नव्याने पाचारण झाल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2019 2:16 pm

Web Title: jason collins jayalalithaa kangana ranaut mppg 94
Next Stories
1 ‘बिग बॉस’फेम आरोह वेलणकरची पूरग्रस्तांना आर्थिक मदत
2 Movie Review: खळखळून हसायला भाग पाडणारी आयुषमानची ‘पूजा’ एकदा पाहाच!
3 …म्हणून बिग बींनी टेकले प्रियांकासमोर हात
Just Now!
X