News Flash

‘जाऊंद्याना बाळासाहेब’ मधला ‘डॉल्बीवाल्या’ सर्वांच्या भेटीला

अजय- अतुल यांचं संगीत असलेल्या या सिनेमाच्या नावाप्रमाणेच पहिल्या गाण्याचे नावही वेगळेच आहे

पाय आपोआप थिरकवणाऱ्या आणि धुमशान अंगात भरवणाऱ्या ‘जाऊंद्याना बाळासाहेब’ च्या पहिल्या ‘डॉल्बीवाल्या’ गाण्याचा टिझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. अजय- अतुल यांचं संगीत असलेल्या या सिनेमाच्या आगळ्या वेगळ्या नावामुळे या सिनेमाचा विषय नक्की काय असेल याबद्दलची उत्सुकता लागून राहिली आहे.
गिरीश कुलकर्णीचं ताकदीचं लेखन, गिरीशच्याच तीक्ष्ण नजरेतून झालेलं काटेकोर दिग्दर्शन आणि चित्रपटातील प्रमुख भूमिकेत त्याचा झालेला कसदार अभिनय या भन्नाट रेसेपितून निर्माण होणारी डिश म्हणजे सिनेखवैयांना एक चमचमीत मेजवानी असणार आहे. शिवाय गिरीश बरोबर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, रिमा, दिलीप प्रभावळकर, सई ताम्हणकर, मनवा नाईक, पूर्वा पवार, नंदकिशोर चौगुले, श्रीकांत यादव, सविता प्रभूणे, भाऊ कदम, स्पृहा जोशी अशी सरस आणि अनुभवी कलाकारांची फौज या सिनेमात पाहायला मिळणार आहे. एच. एम. रामचंद्र यांचं छायांकन, अभिजित देशपांडे याचं संकलन, अनमोल भावेच ध्वनी आरेखन, अशी कुशल तांत्रिक टीम या सिनेमाच्या निर्मितीसाठी काम करतेय, आणि अजून एक खास आकर्षण म्हणजे अजय-अतुल या आघाडीच्या आणि दिग्गज संगीतकारांच्या हातात सिनेमाचे संगीत आहे.
अजय- अतुल हे निर्माते म्हणून देखील या सिनेमातून जोरदार आगमन होत आहे! अजय अतुल यांच्यासह ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’या सिनेमाची निर्मिती केलेल्या पूनम शेंडे, अनुमती, पोस्टकार्ड, हाय-वे चित्रपटाची निर्मिती केलेले विनय गानू, ‘वळू’ आणि ‘गाभ्रीचा पाऊस’चे निर्माते प्रशांत पेठे आणि उमेश कुलकर्णी असे मराठीतले मोठे निर्माते या सिनेमाशी जोडले गेले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2016 3:19 pm

Web Title: jaudyana balasahebs movies first songs teaser release
Next Stories
1 ‘बॅन्जो’ सिनेमातल्या ‘बाप्पा’ गाण्याचा टिझर प्रदर्शित
2 नर्गिस फाख्रीला घातला ६ लाखांचा गंडा…
3 जॅकलिनला हवाय ‘जुडवा २’
Just Now!
X