अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत ‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ समोर आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. चौकशीदरम्यान सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा, अबिगल पांडे यांसारख्या अनेक नामांकित अभिनेत्रींची नावं समोर आली आहेत. दरम्यान या प्रकरणावर प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी प्रतिक्रिया दिली. “ज्या कलाकारांनी सरकारविरोधात आवाज उठवला त्याच कलाकारांवर कारवाई का केली जातेय? सरकारविरोधात आवाज उठवणं म्हणजे देशद्रोह नव्हे”, असं म्हणत त्यांनी एनसीबीच्या कारवाईवर संशय व्यक्त केला आहे.

“मला सैराट २ मध्ये काम करायला आवडेल”; बॉलिवूड अभिनेत्रीला करायचंय मराठी चित्रपटांमध्ये काम

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर यांनी बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणावर भाष्य केलं. ते म्हणाले, “ज्या कलाकारांनी सरकारविरोधात आवाज उठवला त्याच कलाकारांवर कारवाई का केली जातेय? सरकारविरोधात आवाज उठवणं म्हणजे देशाविरोधात भूमिका घेणं नव्हे. परंतु असा अजेंडा पद्धशीरपणे राबवला जातोय. भाजपा सरकार येण्यापूर्वी लोक काँग्रेसवर टीका करायचे. आत्ताच्याच मंत्र्यांनी त्यावेळी काँग्रेसविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. पण त्यांना आपण देशद्रोही म्हटलं नाही. कारण त्यांचा विरोध सारकारच्या कार्यशैलीला होता देशाला नाही. मग आता सरकारविरोधात भूमिका घेणारे देशद्रोही कसे?” अशी टीका जावेद अख्तर यांनी केंद्र सरकारवर केली.

‘ड्रग्जचा विरोध करणाऱ्याला बॉलिवूडमध्ये बहिष्कृत केलं जातं’; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोद्वारे (एनसीबी) सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान D N S K (D म्हणजे दीपिका पदुकोण, N म्हणजे नम्रता शिरोडकर, S म्हणजे श्रद्धा कपूर आणि K म्हणजे करिश्मा) ही नावं समोर आली आहेत. एनसीबीच्या एक व्हॉट्सअॅप चॅट मिळालं आहे. यामध्ये ड्रग्जच्या खरेदी-विक्रीची चर्चा केली जात असल्याचं समोर आलं आहे. एनसीबीकडून करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान मोठे गौप्यस्फोट करण्यात आले. श्रद्धा कपूरशिवाय यामध्ये तीन अन्य अभिनेत्रींची ड्रग चॅटही समोर आली आहेत. जया साहाच्या केलेल्या चौकशीदरम्यान एनसीबीनं चॅटवरील माहितीवरून ती सेलिब्रिटींसाठी सीबीडी ऑईल कुठून मागवते याची विचारणा केली. तसंच चॅटमधील अमित आणि SLB या नावांबद्दलही चौकशी केली. जयाच्या मोबाईलमधीड परत मिळवण्यात आलेल्या डेटामधून आणखी एक गौप्यस्फोटही झाला आहे.