जवळपास दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अभिनेता फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर लग्न करणार असल्याची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. फरहान सध्या त्याच्या आगामी ‘तूफान’ चित्रपटात व्यस्त असून या चित्रपटाचं चित्रीकरण झाल्यानंतर हे दोघं लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. चाहत्यांमध्ये या दोघांच्या लग्नाची चर्चा रंगत असतानाच फरहानचे वडील आणि दिग्गज गीतकार जावेद अख्तर यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
“फरहान लग्न करतोय हे आताच मला तुमच्याकडून समजतंय. फरहानच्या वाढदिवशी मी त्याच्यासोबतच होतो पण त्याने एका शब्दाने मला काही सांगितलं नाही. पण तुम्हाला तर माहितीचं असेल, मुलं बरंच काही लपवत असतात. मी शिबानीला बऱ्याच वेळा भेटलो आहे. ती खूप चांगली आणि गोड मुलगी आहे”, असं जावेद अख्तर म्हणाले.
View this post on Instagram
Bringing the swag this xmas! Merry Merry from mine to yours @faroutakhtar
वाचा : फोटोमधील ‘या’ चिमुकलीला ओळखलं का? आज आहे बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री
फरहानचा ‘तूफान’ २०२०च्या अखेरपर्यंत प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे याचदरम्यान हे दोघं लग्न करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र अद्याप त्यांच्या लग्नाची अधिकृत तारीख समोर आलेली नाही.परंतु या दोघांनीही लग्नाची तयारी आतापासूनच सुरु केल्याचं दिसून येत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 12, 2020 1:49 pm