News Flash

कंगनाच्या अडचणी वाढल्या? जावेद अख्तर यांनी ठोठावला मुंबई कोर्टाचा दरवाजा

कंगनाच्या अडचणीत आणखी भर पडणार असं चित्र दिसतंय. सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी सुद्धा कंगनाच्या विरोधात मुंबई कोर्टात एक याचिका दाखल केलीय.

बॉलीवूडची ‘पंगा’ गर्ल कंगना रणौत तिच्या चित्रपटांच्या व्यतिरिक्त आणखी इतर मुद्द्यांसाठी कायम चर्चेत येत असते. गेल्या काही दिवसांपासून ती कायदेविषयक बाबींमुळे चर्चेत येतेय. यात एक म्हणजे कंगनाचं पासपोर्ट नुतनीकरण प्रकरण होय. कंगनावर दाखल असलेल्या एका एफआयआरमुळे मुंबई हायकोर्टाने कंगनाच्या पासपोर्ट नूतनीकरणासाठी नकार दिला होता. यावरून कंगनाने सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला होता. परंतु आता यासाठी कंगनाच्या अडचणीत आणखी भर पडणार असं चित्र दिसतंय. कारण सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी सुद्धा कंगनाच्या पासपोर्ट नुतनीकरण प्रकरणात उडी घेतली असून तिच्याविरोधात मुंबई कोर्टात एक याचिका दाखल केलीय.

सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी मुंबई कोर्टात दाखल केलेल्या या याचिकेमध्ये कंगनावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. कंगनाने पासपोर्ट नुतनीकरणासाठी अर्ज करताना काही गोष्ट लपवून न्यायालयाची दिशाभूल केली असल्याचे आरोप गीतकार जावेद अख्तर यांनी केलाय. “पासपोर्ट नुतनीकरणासाठी न्यायालयाने कंगनाला तिच्यावर कोणत्या प्रकारचे गुन्हे प्रलंबित आहेत का? असं विचारलं होतं. त्यावेळी कंगनाने यावर नकार दिला. तसंच केवळ दोन गुन्हे दाखल असल्याचं त्यावेळी कंगनाने सांगितलं. पण मी सुद्धा तिच्याविरोधात मानहानीचा गुन्हा नोंदवला आहे, याचा खटला दंडाधिकारी न्यायलयात प्रलंबित आहे.” असं गीतकार जावेद अख्तर यांनी म्हटलंय. हा खटला प्रलंबित असल्याचं कंगनाने न्यालयापासून लपवल्याचं जावेद अख्तर यांनी याचिकेत म्हटलंय.

काय आहे प्रकरण?

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर कंगनाने एका मुलाखतीत एका बॉलिवूड सुपरस्टारसोबतच्या वादावरून जावेद अख्तर यांच्याबाबत काही वादग्रस्त विधानं केली. यावरून गीतकार जावेद अख्तर यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये कंगनाविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. यामुळे माझी विनाकारण मानहानी झाली असून प्रचंड मनस्ताप झाला आहे असा आरोप करत कंगनावर फौजदारी खटला चालवावा, अशी मागणी जावेद अख्तर यांनी अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने १ मार्च रोजी कंगनाला वॉरंट जारी केला होता. मात्र हा खटला अजुनही प्रलंबित आहे.

कंगना सध्या तिचा आगामी चित्रपट ‘धाकड’च्या शूटिंगसाठी बुडापोस्टला पोहोचली आहे. २८ जून रोजी पासपोर्ट नुतनीकरणाच्या सुनावणी दरम्यान कंगनाने आपल्यावर कोणत्याही प्रकारचे खटले प्रलंबित नाहीत, असं सांगितलं होतं. पासपोर्ट नुतनीकरण प्रकरणामुळे तिला ‘धाकड’च्या शूटिंगसाठी पोहोचण्यात उशिर झाला. या चित्रपटातील इतर क्रू मेंबर्स खूप दिवस आधीच पोहोचले होते. सध्या कंगना तिच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पण गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या याचिकेमुळे तिच्या अडचणी वाढण्याची शक्यता दिसून येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2021 10:31 pm

Web Title: javed akhtar moves bombay high court alleging misleading statement by kangana ranaut for passport renewal prp 93
Next Stories
1 आमिर खानपेक्षाही इतकी जास्त शिकलेली आहे किरण राव…
2 ‘पवित्र रिश्ता 2.0’ मध्ये सुशांत सिंह राजपूतला मिस करणार का अंकिता लोखंडे?
3 दिलीप कुमार यांच्या प्रकृतीबाबत पत्नी सायरा यांनी दिली अपडेट; आज नाही मिळाला डिस्चार्ज
Just Now!
X