News Flash

“इतके तंदुरुस्त कलाकार तुम्हाला ड्रग अ‍ॅडिक्ट कसे वाटतात?” जावेद अख्तर यांचा सवाल

ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूडमधील नामांकित कलाकार NCBच्या रडारवर

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत ‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ समोर आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या चौकशीदरम्यान सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा, अबिगल पांडे यांसारख्या अनेक नामांकित अभिनेत्रींची नावं समोर आली आहेत. दरम्यान या प्रकरणावर प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी प्रतिक्रिया दिली. हे कलाकार फिजीकली इतके फिट असताना तुम्हाला ते ड्रग्ज अ‍ॅडिक्ट कसे वाटू शकतात? असा उलट सवाल त्यांनी टीकाकारांनी केला आहे.

‘ड्रग्जचा विरोध करणाऱ्याला बॉलिवूडमध्ये बहिष्कृत केलं जातं’; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर यांनी बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणावर भाष्य केलं. “सध्या जे घडतंय ते योग्य नाही. काही लोक ठरवून बॉलिवूड विरोधात अजेंडा चालवतायेत की काय असं वाटतंय. हे प्रकरण एका अभिनेत्याच्या मृत्यू चौकशीवरुन सुरु झालं होतं. तो मुद्दा आता हळूहळू बाजुला सारला जातोय आणि वेगळ्याच विषयांवर चर्चा केली जातेय. लक्षवेधी बाब म्हणजे टॉपिक बदलतोय पण फिल्म इंडस्ट्रीविरोधातील प्रचार काही कमी होत नाहीये. मी १९५५ पासून या इंडस्ट्रीत काम करतोय. आजच्या सारखे हेल्थ कॉन्शिअस कलाकार यापूर्वी सिनेसृष्टीत नव्हते. यांची शरीरयष्टी पाहून खरंच तुम्हाला ते ड्रग अ‍ॅडिक्ट आहेत असं वाटतं का? अंमली पदार्थांचं सेवन करणारे लोक शारिरीकदृष्ट्या इतके तंदुरुस्त राहू शकत नाही.” अशी प्रतिक्रिया देत जावेद अख्तर यांनी बॉलिवूडला पाठिंबा दर्शवला.

“मला सैराट २ मध्ये काम करायला आवडेल”; बॉलिवूड अभिनेत्रीला करायचंय मराठी चित्रपटांमध्ये काम

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोद्वारे (एनसीबी) सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणाच्या तपासादरम्यान D N S K (D म्हणजे दीपिका पदुकोण, N म्हणजे नम्रता शिरोडकर, S म्हणजे श्रद्धा कपूर आणि K म्हणजे करिश्मा) ही नावं समोर आली आहेत. एनसीबीच्या एक व्हॉट्सअ‍ॅप चॅट मिळालं आहे. यामध्ये ड्रग्जच्या खरेदी-विक्रीची चर्चा केली जात असल्याचं समोर आलं आहे. एनसीबीकडून करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान मोठे गौप्यस्फोट करण्यात आले. श्रद्धा कपूरशिवाय यामध्ये तीन अन्य अभिनेत्रींची ड्रग चॅटही समोर आली आहेत. जया साहाच्या केलेल्या चौकशीदरम्यान एनसीबीनं चॅटवरील माहितीवरून ती सेलिब्रिटींसाठी सीबीडी ऑईल कुठून मागवते याची विचारणा केली. तसंच चॅटमधील अमित आणि SLB या नावांबद्दलही चौकशी केली. जयाच्या मोबाईलमधीड परत मिळवण्यात आलेल्या डेटामधून आणखी एक गौप्यस्फोटही झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2020 1:11 pm

Web Title: javed akhtar on bollywood drugs case mppg 94
Next Stories
1 “सरकारविरोधात आवाज उठवणं म्हणजे देशद्रोह नव्हे”; जावेद अख्तर यांची केंद्रावर टीका
2 Video : करोनाची लागण झाल्याच्या चर्चांवर अलका कुबल म्हणाल्या..
3 बॉलिवूडला पाठिंबा देण्यासाठी अभिनेत्रीने केली ड्रग्ज टेस्ट; रिपोर्ट होतोय व्हायरल…
Just Now!
X