बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार करोना काळात आर्थिक अडचणीत सापडले आहेत. करोना काळात मुंबईत चित्रपटांचं शूटिगं थांबलं होतं. त्यामुळे अनेक मालिका आणि चित्रपटांना याचा मोठा फटका बसला. हाताला काम नसल्यामुळे कलाकार सुद्धा आर्थिक संकटात सापडले आहेत. अभिनेता अनिल कपूरसोबत ‘वेलकम बॅक’ चित्रपटात झळकलेला अभिनेता जावेद हैदर सुद्धा याच कलाकारांच्या यादीत सामील झालाय. करोना परिस्थीतीमुळे बऱ्याच काळापासून हाताला काम नसल्याने निर्माण झालेली आर्थिक चणचण कशीबशी दूर करत दिवस काढत होता. पण आता परिस्थिती खूपच अवघड होत तो पै पैला मोताद झालाय. होते नव्हते तेव्हढे सगळे पैसे संपल्याने आता तो त्याच्या मुलीच्या शाळेची फी सुद्धा भरू शकला नाही. त्यामूळे अभिनेता जावेद हैदरच्या मुलीला ऑनलाईन क्लासेसमधून बाहेर काढण्यात आलं.

कोरोना काळात अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या तर कोणाचे व्यवसाय बुडाले. यामुळे अनेकांनी नैराश्यापोटी आत्महत्याही केल्या. अनेक कलाकारांना तर दोन वेळचं जेवण सुद्धा अवघड बनलं. अभिनेता अनिल कपूर यांच्या ‘वेलकम बॅक’ चित्रपटात झळकलेला कलाकार जावेद हैदर सुद्धा याच परिस्थितीचा सामना करतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Javed Hyder (@javedhyder)

लॉकडाउनमुळे गेली दीड वर्षे कोणतंच काम मिळालं नसल्याने आज घरखर्च कसा चालवायचा असा मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिलाय. ही परिस्थिती अशा कलाकाराची आहे, ज्याने त्याच्या लहानपणापासून फिल्म इंडस्ट्रीत काम केलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Javed Hyder (@javedhyder)

एका माध्यमाशी बोलताना त्याने आपल्या या आर्थिक टंचाईबाबत खुलासा केलाय. यावेळी बोलताना अभिनेता जावेद हैदर म्हणाला, “माझी मुलगी आठवीत शिकतेय. एक वडील या नात्याने तिला उत्तम शिक्षण मिळावं अशी माझी खूप इच्छा आहे. जोपर्यंत माझं काम सुरू होतं, तोपर्यंत परिस्थिती सामान्य होती. पण लॉकडाउनमध्ये माझं काम बंद झालं…तस तशी आर्थिक चणचण भासू लागली…लॉकडाउनमध्ये माझ्या मुलीचे ऑनलाइन क्लासेस सुरू होते…अचानक एक दिवस तिला ऑनलाइन क्लासेसमधून बाहेर काढलं…यासंदर्भात जेव्हा शाळेच्या शिक्षकांसोबत बोललो त्यावेळी मला सांगितलं की, तीन महिन्यांची फी माफ केली होती…प्रत्येक महिन्याला अडीच हजार रूपये फी भरावी लागत होती… ”

 

View this post on Instagram

 

A post shared by Javed Hyder (@javedhyder)

यापुढे बोलताना अभिनेता जावेद हैदर म्हणाला, “लॉकडाउनमध्ये गेल्या दीड वर्षापासून माझ्या मुलीचे ऑनलाइन क्लासेस सुरू होते…मी प्रत्येक वेळी तिच्या शाळेची फी भरत होतो…पण गेले काही महिने फी भरू शकलो नाही…त्यामुळे माझ्या मुलीला ऑनलाइन क्लासेसमधून बाहेर काढलं. कशीबशी पैशांची व्यवस्था केली, त्यानंतर तिला पुन्हा ऑनलाइन क्लासेसमध्ये सामील करण्यात आलं.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Javed Hyder (@javedhyder)

अभिनेता अनिल कपूरच्या ‘वेलकम बॅक’ चित्रपटात काम केल्यानंतर जावेद हैदर भरपूर चर्चेत आला होता. तसंच त्याने सलमान खानच्या ‘राधे’ चित्रपटात सुद्धा काम केलं होतं. यापूर्वी त्याने ‘लाईफ की ऐसी तेसी’, ‘खुदगर्ज’, ‘विश्वात्मा’, ‘काला बाजार’, ‘बाप नम्बरी बेटा दस नम्बरी’, ‘बीवी हो तो ऐसी’, ‘सडक’, ‘नाम’, ‘शबनम मौसी’ अशा अनेक चित्रपटात त्याने काम केलंय.