करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशभरातील उद्योगांना मोठे नुकसान झाले आहे. लाखो लोकांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे. परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी केरळमधील टॅक्सी चालकांनी एक अनोखी कल्पना राबवली आहे. या टॅक्सी चालकांना व्हिडीओ अभिनेता जावेद जाफरी याने पोस्ट केला आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – “करोनामुळे मंदिर बंद अन् दारुची दुकानं सुरु”; संतापला दाक्षिणात्य सुपरस्टार

असं काय आहे या व्हिडीओमध्ये?

करोना विषाणूपासून सुरक्षित राहण्यासाठी केरळमधील टॅक्सी चालकांनी आपल्या गाड्यांमध्ये एक फायबर ग्लास लावले आहेत. चालक आणि पॅसेंजर यांच्यामध्ये लावलेले हे फायबर दोन लोकांचा थेट संबंध टाळण्यास मदत करते. परिणामी सोशल डिस्टन्सिंगचा नियम देखील पाळला जातो व उदरनिर्वाहासाठी काम देखील सुरु राहते. जावेद जाफरीने या टॅक्सी चालकांचे ट्विटव्दारे कौतुक केले आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – “लॉकडाउनमुळे कामाचे पैसे मागायला देखील लाज वाटतेय”; अभिनेत्रीने दिली प्रतिक्रिया

जावेद जाफरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून तो कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. यावेळी त्याने टॅक्सी चालकांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.