22 September 2019

News Flash

९ वर्षानंतर ‘हा’ अभिनेता झाला बाबा, बाळाचा पहिला फोटो केला शेअर

या अभिनेत्याला कन्यरत्न झालं आहे

कोणत्याही दाम्पत्याच्या आयुष्यामध्ये नव्या पाहुण्याचं अर्थात लहान बाळाचं आगमन होणं यासारखा दुसरा आनंद नसतो. अनेक जण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. छोट्या पडद्यावरील अभिनेता जय भानुशाली याच्या आयुष्यातही हा आनंद आला आहे. तब्बल नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जय बाबा झाला आहे. जयाच्या पत्नीने अभिनेत्री माहीने नुकताच एका लहान मुलीला जन्म दिला आहे. जयने त्याच्या लहान मुलीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

जयप्रमाणेच माहीनेही आपल्या चिमुकलीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये जय आपल्या लहान मुलीच्या पायांना किस करताना दिसत आहे. जयने अद्यापतरी त्याच्या मुलीचं नाव जाहीर केलेलं नाही. मात्र या बाप-लेकीचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगला चर्चेत येत आहे.

दरम्यान, माहीने शेअर केलेल्या फोटोला तिने “ट्विंकल-ट्विंकल लिटील स्टार. आम्ही देवाकडे एक मागणं मागितलं होतं आणि आज तू आमच्यासोबत आहेस. आम्हाला आई-वडील होण्याचं सुख दिल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला मुलगी झाली आहे. आम्हाला हे सुख दिल्याबद्दल देवाचे मनापासून आभार. माझं आयुष्य बदलून गेलं आहे”, असं कॅप्शन देत आनंद व्यक्त केला आहे.

 

First Published on August 21, 2019 1:10 pm

Web Title: jay bhanushali baby pic jay and mahhi vij blessed with a baby girl see first photo ssj 93