News Flash

जया बच्चन ‘या’ नावाने चिडवतात ऐश्वर्याला, मुलाखतीमध्ये केला होता खुलासा

त्यांनी एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे.

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे जया बच्चन. आज ९ एप्रिल रोजी त्यांचा ७३ वा वाढदिवस आहे. जया बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त नव्या नंदा, अभिषेक बच्चन आणि बॉलिवूडमधील इतर काही कलाकारांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ऐश्वर्या रायने देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. ऐश्वर्या आणि जया बच्चन या सासू-सूनेच्या जोडीमधे चांगले बॉडिंग आहे. एका मुलाखतीमध्ये जया बच्चन यांनी ऐश्वर्याला कोणत्या नावाने चिडवतात हे सांगितले आहे.

जया बच्चन यांनी एका मुलाखतीमध्ये ऐश्वर्याला कशा प्रकारे चिडवत असतात हे सांगितले होते. ‘ऐश्वर्या एक आई म्हणून खूप काम करत असते. ती तिच्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पडते. मी बऱ्याच वेळा तिला चिडवत असते की आराध्या किती भाग्यवान आहे. तुम्ही कल्पना करु शकता आराध्याकडे मिस वर्ल्ड ऐश्वर्यासारखी नर्स आहे’ असे जया यांनी म्हटले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Navya Naveli Nanda (@navyananda)

पुढे त्या म्हणाल्या, ‘माझी इच्छा आहे की ऐश्वर्याने बाहेर जाऊन काम करायला सुरुवात करावी. पण ती कोणावरही अवलंबून राहात नाही. खरतर ही खूप चांगली गोष्ट आहे.’

आणखी वाचा- “आमचं लग्न टिकावं म्हणून मी त्याला सोडलं…”, जया बच्चन यांचा खुलासा!

‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्येही त्यांनी ऐश्वर्याचं कौतुक केले होते. “ऐश्वर्या बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेत्री आहे. मात्र तरीही बच्चन कुटुंबात असताना ती सर्वात मागे उभी राहते. उगाचंच पुढे पुढे करत नाही. सर्वांचा आदर करते. विशेष म्हणजे ती खूप शांत आणि हसऱ्या स्वभावाची आहे,” असे त्या म्हणाल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 4:18 pm

Web Title: jaya bachchan reveals about aishwarya rai says i tease her calling as nurse avb 95
Next Stories
1 वडिलांच्या आठवणीत इरफान खानच्या मुलाला स्टेजवरच कोसळले रडू
2 आणि बर्थडे केक कापतानाच स्वराला रडू कोसळलं, व्हिडीओ व्हायरल
3 कुणीतरी येणार गं…‘रंग माझा वेगळा’ मालिकेत रंगणार दीपाच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम
Just Now!
X