News Flash

…त्यावेळी का गप्प होतात?; जया प्रदा यांचा जया बच्चन यांना सवाल

रवि किशन यांची केली पाठराखण

संग्रहित छायाचित्र.

बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण राजकीय मुद्दा बनल्याचं दिसत आहे. अभिनेत्री कंगना रणौतच्या आरोपानंतर भाजपाचे खासदार रवि किशन यांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर ज्येष्ठ अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांनी यावरून सुनावलं होतं. या वादात ज्येष्ठ अभिनेत्री व भाजपा नेता जया प्रदा यांनी उडी घेतली असून, रवि किशन यांची पाठराखण करत जया बच्चन यांना सवाल केला आहे.

‘आजतक’शी बोलताना जया प्रदा यांनी जया बच्चन यांच्यावर निशाणा साधला आहे. जया प्रदा यांनी जया बच्चन यांच्या भाषणावरून आक्षेप घेतला आहे. “एका मुद्यावर बोलणं व दुसऱ्या मुद्यावर मौन धरणं चुकीचं आहे. आझम खान यांनी आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती. त्यावर अनेकांनी त्यांचं समर्थन केलं होतं. पण, जया बच्चन यांनी एकदाही विरोध केला नाही. त्यांनी एकदाही आझम खान यांच्या भाषेची निंदा केली नाही. जया बच्चन यांनी कंगनाच्या बाजूनं एक शब्दही काढला नाही. कंगनाविरोधात राजकारण केलं गेलं, त्यामुळे जया बच्चन यांनी काहीतरी बोलायला हवं होतं,” अशी टीका जया प्रदा यांनी केली.

जया प्रदा यांनी खासदार रवि किशन यांची पाठराखणही केली. “फिल्म इंडस्ट्रीला कोणीही बदनाम करू शकत नाही. कुणाची तितकी पात्रता नाहीये. राहिली गोष्ट रवि किशन यांनी मांडलेल्या मुद्याची, त्यांनी संसदेत जे विधान केलं आहे. तर मला वाटत त्यांच्या बाजूनं उभं राहिलं पाहिजे. कारण त्यांनी चुकीची काही म्हटलेलं नाही. त्यांनी हेच म्हटलंय की बॉलिवूडमध्ये काही लोक अमली पदार्थांच्या आहारी गेलेले आहेत. ड्रग्ज संदर्भात जे व्यवहार होताहेत ते रोखायला हवेत. देशातील तरुणांना ड्रग्जपासून वाचवायला हवं, असं ते म्हणाले आहेत. मला वाटत नाही की यात ते काही चुकीचं बोलले आहेत. संपूर्ण इंडस्ट्रीला दोषी ठरवण्याची कुणाची पात्रता नाही,” असं जया प्रदा म्हणाल्या.

“आम्ही लोकही छोट्याचे मोठे झालो आहोत. हे सगळं इंडस्ट्रीमुळे झालं आहे. वरिष्ठ कलाकारांविषयी, त्यांच्या कामाविषयी आम्हाला अभिमान वाटतो. रिया चक्रवर्तीच्या माहितीनंतर अनेक ड्रग्ज पेडलर्संना अटक करण्यात आलं. पण, जया बच्चन यांनी असा का विचार केला. त्या खूप रागात होत्या. त्या नाराजही होत्या. त्या म्हणाल्या की, हे त्या स्वीकारणार नाहीत. हा इंडस्ट्रीचा अपमान आहे. मला हे सांगायचं की त्या याला वैयक्तिक घेत आहेत. मला वाटत की हा राजकीय प्रभाव असावा. त्या राजकीय पक्षाशी जोडलेल्या आहेत. त्या पक्षाचा हा प्रभाव असावा. याला राजकीय अंगानं घ्यायला नको,” असं जया प्रदा म्हणाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 12:42 pm

Web Title: jaya prada jaya bachan actress bjp leader mp bollywood kangana ranaut bmh 90
Next Stories
1 “उर्मिला सॉफ्ट पॉर्न करणारी अभिनेत्री नाही”; कंगनावर राम गोपाल वर्मा संतापले
2 Birthday Special : ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्याविषयी काही खास गोष्टी
3 मिलिंद सोमणने दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांवर मोदींचा रिप्लाय, म्हणाले…
Just Now!
X