News Flash

जयललिता यांचा भास व्हावा असा कंगनाचा लूक

या फोटोमध्ये कंगना हुबेहूब जयललिता यांच्याप्रमाणे दिसत आहे

कंगना रणौत

तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित लवकरच ‘थलाइवी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री कंगना रणौत, जयललिता यांची भूमिका साकारत आहे. काही दिवसापूर्वी या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता कंगनाचा फर्स्ट लूक समोर आला आहे. विशेष म्हणजे या फोटोमध्ये कंगना हुबेहूब जयललिता यांच्याप्रमाणे दिसत आहे.

बॉलिवूड क्वीन कंगनाने सध्या सुपरहिट चित्रपटांचा धडाका लावला आहे. ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’, ‘जजमेंटल है क्या’ या चित्रपटांमध्ये कंगनाने उत्तम अभिनय करत प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये कंगनाच्या आगामी ‘थलाइवी’ची उत्सुकता आहे. त्यातच ही उत्सुकता वाढविण्यासाठी कंगनाच्या बहिणीने रंगोलीने कंगनाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.

प्रदर्शित झालेल्या फोटोमध्ये कंगना हुबेहूब जयललिता यांच्याप्रमाणेच दिसत आहे. २४ फेब्रुवारी रोजी जयललिता यांचा वाढदिवस असतो त्यामुळे या दिनाचं निमित्त साधत चित्रपटाच्या टीमने कंगनाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. त्यासोबतच जयललिता यांचा तरुणपणीचा फोटोही शेअर करण्यात आला आहे.

दरम्यान, हा चित्रपट हिंदी आणि तामिळ या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तामिळमध्ये या चित्रपटाचं नाव ‘थलाइवी’ आहे. तर हिंदीमध्ये ‘जया’. हा चित्रपट २६ जून २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2020 1:17 pm

Web Title: jayalalitha 2nd birth anniversary kangana ranaut shares look from thalaivi ssj 93
Next Stories
1 ‘या’ कारणामुळे होतेय दिशा- आदित्यची चर्चा
2 ‘ही लोकं अक्कलशून्य माकडं आहेत’; तोतरेपणाची खिल्ली उडवणाऱ्यांवर हृतिक भडकला
3 निक-प्रियांकाच्या लग्नात घडलेल्या ‘या’ गोष्टीमुळे सासूबाई नाराज!
Just Now!
X