News Flash

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर

नुकतीच त्यांच्या अभिनय कारकिर्दीला ६० वर्ष पूर्ण झाली

जयंत सावरकर यांना विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर

मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना यावर्षीचा मानाचा विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर झाला आहे. विष्णुदास भावे गौरवपदक, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि ११,००० रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. येत्या मराठी रंगभूमी दिनी म्हणजे ५ नोव्हेंबरला सांगली येथे या पुरस्काराचे वितरण होईल. या समारंभात ९६वा व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ नाटककार यांच्याहस्ते हा पुरस्कार देण्यात येईल. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदीर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विनायक केळकर, कार्यवाह वि.ज. ताहनकर, कोषाध्यक्ष मेधा केळकर, संचालक बलदेव गवळी, विलास गुप्ते, प्राचार्य भास्कर ताम्हनकर उपस्थित होते.

वयाच्या ८० व्या वर्षीही जयंत सावरकर आपल्या तब्येतीची योग्य ती काळजी घेतात. एक कलाकार म्हणून सर्वसामान्यांपेक्षा तब्येतेची थोडी जास्तच काळजी घ्यावी लागते. इतकेच नव्हे तर या वयातही ते अनेक ठिकाणी नाटकांचे प्रयोग त्याच जोषात करतात. नाटकानंतर प्रत्येक कलाकाराबरोबर ते नाटकाबाबतची चर्चाही करतात. नुकतीच त्यांच्या अभिनय कारकिर्दीला ६० वर्ष पूर्ण झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2016 8:33 pm

Web Title: jayant sawarkar honour with vishnudas bhave award
Next Stories
1 … ही अभिनेत्री दाखवून देणार बांगलादेशी निर्वासितांच्या यातना
2 सोनमचा भावाला दिलेला हा सल्ला ऐकून तुम्हीही व्हाल चकित
3 मिथुन चक्रवर्तीची तब्येत खालावली, उपचारासाठी अमेरिकेत रवाना
Just Now!
X