News Flash

‘Wasteman’म्हणत पंजाबी गायकाने सुनील शेट्टीला सुनावलं

त्याचे हे ट्वीट सध्या चर्चेत आहे.

अमेरिकन पॉपस्टार सिंगर रिहानाने दिल्लीत सुरू असलेल्या कृषी कायद्या विरोधातील आंदोलनाचे समर्थन केल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. फक्त रिहानाने नाही तर पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गने आणि पॉर्नस्टार मिया खलिफानेही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान अभिनेता सुनील शेट्टीने केलेल्या ट्वीटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सुनील शेट्टीने केलेल्या ट्वीटवरुन पंजाबी गायक जॅज धामीने ‘Wasteman’ म्हणत त्याला ट्रोल कले आहे.

सुनील शेट्टीने “अर्धवट सत्य जाणून घेणे या पेक्षा कोणतीही गोष्ट वाईट नसते. म्हणून, आपण कोणत्याही गोष्टीचा विचार सर्व बाजूने केला पाहिजे” या आशयाचे ट्वीट त्याने केले होते. त्याचे हे ट्वीट चर्चेत होते.

आणखी वाचा- “एका ट्विटमुळे तुमच्या ऐक्याला बाधा पोहचत असेल तर तुम्हाला…”; सेलिब्रिटींना लगावला टोला

त्याचे हे ट्वीट पाहून जॅज धामीने सुनीलला सुनावले आहे. ‘अर्धवट सत्य? भारतातील वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले हजारो शेतकरी कडाक्याच्या थंडीमध्ये ट्रॅक्टर खाली झोपतात आणि त्यांच्या हक्काची मागणी करतात हे अर्ध सत्य आहे? आतापर्यंत जवळपास २०० लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यावेळी बोलण्यासाठी तुझ्याकडे काहीच नव्हते! Wasteman’ या आशयाचे ट्वीट करत त्याने सुनील शेट्टील सुनावले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2021 1:58 pm

Web Title: jaz dhami slaims suniel shetty avb 95
Next Stories
1 Drugs Case : दिया मिर्झाच्या एक्स मॅनेजरच्या डोक्यावर टांगतील तलवार; कधीही अटक होण्याची शक्यता
2 “एका ट्विटमुळे तुमच्या ऐक्याला बाधा पोहचत असेल तर तुम्हाला…”; सेलिब्रिटींना लगावला टोला
3 “१६ जुलै २०२१ रोजी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करा”, पंतप्रधान मोदींना पाठवलं पत्र
Just Now!
X