27 February 2021

News Flash

Happy Birthday Jitendra: ‘ग्रीटींग’मधून बालमित्र जागवणार ‘डेटींग’च्या आठवणी

आम्ही सर्व एकाचवेळी डेट करत होतो

अभिनेता जितेंद्र आणि कपूर कुटुंबिय

बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते जितेंद्र यांचा ७५ वा वाढदिवस लवकरच थाटामाटात साजरा होणार आहे. पण त्यांच्या वाढदिवसाला तुषार आणि नातू लक्ष्य उपस्थित राहणार नाही, अशी चर्चा सिनेवर्तुळात होती. तुषार त्याचा आगामी सिनेमा ‘गोलमाल अगेन’च्या चित्रीकरणामध्ये बिझी असल्यामुळे तो त्यांच्यासोबत लक्ष्यलाही तिथे घेऊन जाणार आहे अशी चर्चा बी- टाऊनमध्ये होती. पण ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत जितेंद्र यांनी लक्ष्य माझ्यासोबत नक्की असेल असे सांगितले. जितेंद्र यांची पत्नी शोभा कपूर त्यांच्या वाढदिवसासाठी जयपूरमध्ये एका ग्रॅण्ड पार्टीचं आयोजन करत आहेत.

७ एप्रिलला जितेंद्र ७५ वर्षांचे होणार. याबद्दल बोलताना जितेंद्र म्हणाले की, या दिवशी माझा नऊ महिन्यांचा नातू माझ्यासोबत असणार याचाच मला जास्त आनंद आहे. सुरुवातीला तुषार लक्ष्यला त्याच्यासोबत हैदराबादला ‘गोलमाल अगेन’ सिनेमाच्या चित्रीकरणाला घेऊन जाणार होता. पण आता तो माझ्या आणि शोभासोबत जयपूरला येणार आहे. याचबरोबर अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे माझे लहानपणीचे चार मित्र ज्यांच्यसोबत मी माझं बालपण जगलो ते सर्व डेन्मार्क, अमेरिकेहून वाढदिवसादिवशी खास मला भेटायला येणार आहेत. मी आणि शोभा तसेच माझे मित्र आणि त्यांच्या पत्नी आम्ही सर्व एकाचवेळी डेट करत होतो. त्यामुळे ५६ वर्षांपूर्वीच्या आठवणींना आम्ही सगळे भेटल्यावर पुन्हा एकदा उजाळा मिळणार आहे. माझ्यासाठी शोभाने हे सगळं घडवून आणलं याचाही मला आनंद आहे.

तुषारच्या सिनेमाच्या चित्रीकरणाच्या वेळा फार आधीच ठरल्या होत्या. त्यामुळे तो एक दिवस आधीच बाबांचा वाढदिवस साजरा करणार आहे. ‘गोलमाल अगेन’चे मुंबईतले चित्रीकरण रविवारी संपले आणि फक्त एका दिवसासाठी हैदराबादवरुन जयपूरला जाणं तुषार आणि लक्ष्य दोघांसाठीही त्रासदायक होणार होतं. त्यामुळे हैदराबादला जाण्यापूर्वी तुषार घरीच बाबांचा वाढदिवस साजरा करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 6:49 pm

Web Title: jeetendra 75th birthday tusshar kapoor will not attend celebrations but grandson laksshya will
Next Stories
1 ..या नावाने सुरु होणार शाहरुखचे नवे हॉटेल
2 Baahubali 2 Hindi jukebox out: ‘बाहुबली’ हिट गाणी फ्लॉप!
3 ‘बेगम जान’ विद्या चित्रपटसृष्टीला करणार होती अलविदा…
Just Now!
X