News Flash

‘जगा आणि जगू द्या’; इंटिमेट फोटोमुळे ट्रोल करणाऱ्यांना सुष्मिता सेनच्या वहिनीचं उत्तर

तुम्ही पती-पत्नी असलात तरी बेडरुमधील फोटो शेअर करु नये असे म्हणत नेटकऱ्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता.

छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम, राजीव सेन

अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन व त्याची पत्नी चारू सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. यामागचं कारण म्हणजे दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेले इंटिमेट फोटो. लॉकडाउनच्या काळात घरीच असलेल्या या जोडप्याने गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर काही इंटिमेट फोटो पोस्ट केले होते. त्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. या ट्रोलर्सना आता सुष्मिता सेनच्या वहिनीने उत्तर दिलं आहे.

‘जगा आणि जगू द्या’, असं म्हणत चारूने ट्रोलर्सकडे दुर्लक्ष केलं आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “मला लोकांचं वागणंच समजत नाही. जगा आणि दुसऱ्यांना जगू द्या. सध्या लोकांमध्ये फार नकारात्मकता आहे. या ट्रोलिंगकडे मी दुर्लक्षच करू शकते. करोना व्हायरसमुळे लोकांमधील चिंता वाढली आहे आणि सेलिब्रिटींवर ते सहज निशाणा साधू शकतात. म्हणून ट्रोलिंगचं प्रमाण वाढलंय.”

तुम्ही पती-पत्नी असलात तरी बेडरुमधील फोटो शेअर करु नये असे म्हणत नेटकऱ्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. चारू हीसुद्धा अभिनेत्री आहे. ‘मेरे अंगने मे’ या मालिकेत तिने भूमिका साकारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2020 10:16 am

Web Title: jeeyo aur jeene do yaar sushmita sen sister in law charu asopa reacts to the trolls ssv 92
Next Stories
1 ‘चेन्नई एक्स्प्रेस’ निर्मात्याच्या मुलीला करोनाची लागण
2 ‘देख भाई देख’च्या चित्रीकरणादरम्यान अभिनेत्याच्या मुलाचा झाला होता मृत्यू, जाणून घ्या सविस्तर…
3 Video: १०० शतकांचा रेकॉर्ड कोण मोडणार? सलमानच्या प्रश्नावर सचिनने केली होती भविष्यवाणी
Just Now!
X