बॉलिवूडमधील रितेश देशमुख आणि जेनेलियाच्या जोडीला चाहत्यांकडून कायम पसंती मिळते. दोघही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. आपल्या कुटुंबासोबतचे अनेक फोटो ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात. तर कधी मित्र मैत्रिणींसोबत धमाल करतानाचे व्हिडीओ शेअर करुन चाहत्यांच्या संपर्कात राहतात.

नुकताच रितेश आणि जेनेलिया यांनी बॉलिवूडमधील त्यांच्या काही मित्रांसोबत पार्टी केलीय. या पार्टीतील एक धमाल व्हिडीओ जेनेलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध तामिळ अभिनेता विजय यांच्या एका गाण्यावर डान्स करण्याचा ट्रेंड पाहायला मिळतोय. अनेक सेलिब्रिटी या तामिळ गाण्यावर ठेका देताना दिसत आहेत.जेनेलियाने शेअर केलेल्या व्हिडीओत ती रितेश देशमुख आणि इतर मित्रांसोबत नाचताना दिसतेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

या व्हिडीओला तिने “हे तुझ्यासाठी विजय… तुझं यश नेहमीच सेलिब्रेट करतो..” असं कॅप्शन दिलंय. या व्हिडीओत तिच्यासोबत रितेश तसंच अभिनेता शब्बीर आलुवालिया, आशिष चौधरी आणि अभिनेत्री जेनिफर विंगेट असे अनेक जण धमाल डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओला चाहत्यांनी चांगलच पसंत केलंय.

काही दिवसांपूर्वीच जेनेलिया स्केटिंग शिकत असताना पडली होती. यामुळे तिच्या हाताला दुखापत झाली होती. यावेळीची व्हिडीओ देखील तिने शेअर केला होता. हाताला दुखापत झाली असतानाही जेनेलिया मित्रांसोबत भन्नाट डान्स केलाय.