News Flash

जेनिफर विंगेटने केलं केशवपन?

'बेहद' मालिकेत जेनिफरचा नवा लूक

अभिनेत्री जेनिफर विंगेट

‘सोनी’ वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या ‘बेहद’ मालिकेत ‘माया’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर विंगेट सध्या खूप चर्चेत आहे. जेनिफरने मालिकेतून दमदार कामगिरी करत प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिकेतील तिचा लूक सुरुवातीपासून चर्चेत होता आणि आणखी एका नव्या लूकमध्ये ती प्रेक्षकांना आश्चर्यचकित करण्याच्या तयारीत आहे. आपल्या सौंदर्याने चाहत्यांना मोहित करणारी जेनिफर चक्क केसांविना दिसणार आहे. केशवपन केलेला जेनिफरचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

मालिकेच्या पुढील भागांमध्ये ती एक विधवा असून पांढऱ्या साडीमध्ये लहान मुले आणि संतांसोबत फिरताना दिसणार आहे. तिचे केशवपनदेखील दाखवण्यात येणार आहे. मालिकेत लीप येणार असून माया अर्जुनशी बदला घेताना दिसणार आहे. या वेगळ्या लूकसाठी जेनिफर खरोखरच केशवपन करणार का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, मात्र तसे नसून ती विगचा वापर करणार आहे.

वाचा : वडोदरा न्यायालयाकडून शाहरूखला समन्स

या लीप एपिसोडमध्ये मायाचे प्राण साधू-संत वाचवतात आणि तिला एका आश्रममध्ये नेले जाते. आश्रममधील लहान मुलांना पाहून आपण कशाप्रकारे आपल्या बाळाला गमावलो आणि त्यानंतर कशाप्रकारे अर्जुनने तिला मारण्याचा प्रयत्न केला हे मायाला आठवते. त्यानंतर केशवपन करून माया अर्जुनचा बदला घेण्यासाठी सज्ज होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 8:13 pm

Web Title: jennifer winget will be seen bald in bayhadh
Next Stories
1 Munna Michael Beparwah Song: टायगरचा अफलातून डान्स सर्वांचीच मनं जिंकतोय
2 …या कारणामुळे पाहायला मिळणार मीरा- करिनामध्ये स्पर्धा
3 वडोदरा न्यायालयाकडून शाहरूखला समन्स
Just Now!
X