News Flash

या अभिनेत्रीला मानते कीम कर्दाशिअन

अचानकपणे कीमकडून आलेल्या कौतूकाला जेसिकाने हसून टाळले.

रिअॅलिटी टिव्ही कलाकार कीम कर्दाशिअनची आदर्श अभिनेत्री दुसरी कोणी नसून सारा जेसिका पार्कर आहे. फीमेलफर्स्ट डॉट को डॉट युके या संकेतस्थळी दिलेल्या माहितीनुसार, तिचे पती केनी वेस्ट याच्या एका संगीत कार्यक्रमा दरम्यान सेक्स अॅण्ड द सिटीमधील अभिनेत्री जेसिका पार्करला कीम कर्दाशिअन भेटली. तिला पाहून कीम भारावून गेली.
तिच्याबरोबर फोटो काढताना जेसिका कशी तिचा आदर्श आहे हे सांगायला मात्र ती विसरली नाही. अचानकपणे कीमकडून आलेल्या कौतूकाला जेसिकाने हसून टाळले. पण कीम मात्र तिला सांगतच राहीली की तिने पार्करचे केलेले कौतूक देखाव्याचे नसून सच्चे आहे.
आपलं एवढं कौतुक झाल्यावर जेसिकाने कीमबरोबर एक फोटोही काढला. या फोटोसाठी कीमचा नवरा केनी वेस्टलाही तिने बोलावले.

Me & my mini me! #MSG #DaddysConcert #vetements #yeezyseason4clearmules

A photo posted by Kim Kardashian West (@kimkardashian) on

I ❤️ my family

A photo posted by Kim Kardashian West (@kimkardashian) on

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2016 9:23 pm

Web Title: jessica parker is kim kardashians idol
Next Stories
1 अखेर दीपिकाने विनला हिंदी शिकवले
2 खिलाडी कुमार असा साजरा करणार त्याचा बर्थडे
3 आशुतोष गोवारीकर यांनी माफी मागावी, पाकिस्तानी मंत्र्यांची मागणी
Just Now!
X