01 June 2020

News Flash

जान्हवी कपूर झाली ट्रोल; कारण जाणून तुम्हालाही येईल हसू

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

‘धडक’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे जान्हवी कपूर. या चित्रपटात जान्हवीसोबत इशान खट्टर मुख्य भूमिकेत दिसला होता. सध्या जान्हवी तिचा आगामी चित्रपट ‘गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल’ च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. या चित्रटात जान्हवी महिला वैमानिकाची भूमिका साकारणार आहे.

‘गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल’ या चित्रपटासाठी जान्हवी वैमानिकाचे प्रशिक्षण घेत आहे. सध्या जान्हवीचा हे प्रशिक्षण घेऊन बाहेत येत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये जान्हवीने पिवळसर रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला असून त्यावर शोभून दिसेल अशी ओढणी घेतली आहे. या लूकमध्ये जान्हवी अत्यंत सुंदर आणि ग्लॅमरल अंदाजात दिसत होती. पण ड्रेसवर घेतलेल्या ओढणीचा प्राइज टॅग काढण्यास जान्हवी विसरली.

 

View this post on Instagram

 

#jhanvikapoor snapped at her pilates class today #viralbayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये जान्हवीच्या ओढणीचा प्राइज टॅग पाहता नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. नेटकऱ्यांनी ‘बिचारी जान्हवी. घाईघाईमध्ये ओढणीचा टॅग काढायला विसरली’, ‘जान्हवी प्राइज टॅग लावून फिरते’ अशा अनेक कमेंट करत तिला ट्रोल केले आहे.

आणखी वाचा : …अखेरच्या क्षणी मोडलं सलमानचं लग्न; साजिदनं सांगितला घडलेला प्रसंग

गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल या चित्रपटात जान्हवी कपूरसह पंकज त्रिपाठी, अंगद बेदी, विनीता कुमार आणि मानव विज हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण शर्मा करत आहेत. अंगद चित्रपटात जान्हवीच्या भावाच्या भूमिकेत दिसणार आहे. कारगिल युद्धात गुंजन फ्लाईट लेफ्टनंट श्रीविद्या राजनसोबत लढाऊ विमान उडवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. कारगिल युद्धात पाकिस्तानी सैन्यदलाकडून भारतीय सैनिकांवर निशाणा साधण्यात येत होता. त्या भागातूनच गुंजन यांनी लढाऊ विमान उडवत सैन्यदलातील जवानांना सुरक्षितरित्या बाहेर काढले होते. त्यामुळे त्यांची ही साहसाची गाथा चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

पहिल्यांदा जान्हवी एका धाडसी महिलेची भूमिका साकारणार असून तिला या भूमिकेमध्ये पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे. धडकमध्ये जान्हवीने वठविलेली भूमिका आणि तिच्या आगामी चित्रपटातील भूमिका पूर्णपणे वेगळी असल्यामुळे जान्हवीला या भूमिकेसाठी फार मेहनत घ्यावी लागली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2019 2:20 pm

Web Title: jhanvi kapoor get troll on social media avb 95
Next Stories
1 यंदाची दिवाळी प्रेक्षकांसाठी खास, बॉक्स ऑफिसवर धडकणार ‘हे’ पाच चित्रपट
2 पुण्यात प्रभात सिनेमागृहाबाहेर ‘मनसे’चं आंदोलन
3 Video : मलायकाच्या बर्थ डे पार्टीत अर्जुनचा बेभान डान्स
Just Now!
X