News Flash

आता CBI न्यायालयात होणार जिया खान मृत्यू प्रकरणाची सुनावणी; आठ वर्षापासून प्रलंबित होतं प्रकरण

वयाच्या २५ व्या वर्षी जिया खानने जगाचा निरोप घेतला. तिच्या मृत्यूला ८ वर्षे झाली तरी अद्याप तिच्या मृत्यूचे रहस्य उलगडलेले नाही.

jiah-khan-death-case-cbi-court-will-now-hear
(PTI/ File)

८ वर्षापूर्वी अभिनेत्री जिया खानने आत्महत्या केली होती. त्यानंतर सापडलेल्या सुसाइड नोटवरून सुरज पांचोलीला आरोपी मानण्यात आलं. आतापर्यंत या प्रकरणाबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. अखेर आठ वर्षानंतर आता या प्रकरणाची सुनावणी सीबीआय न्यायालयात होणार आहे. जिया खान मृत्यू प्रकरणी आतापर्यंत सत्र न्यायालयात हा खटला सुरू होता. त्यानंतर सत्र न्यायालयाने हे प्रकरण सीबीआय न्यायालयात वर्ग केलंय.

बॉलिवूड अभिनेत्री जिया खानने ३ जून २०१३ रोजी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं. वयाच्या २५ व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. तिच्या मृत्यूला ८ वर्षे झाली तरी अद्याप तिच्या मृत्यूचे रहस्य उलगडलेले नाही. तिच्या आत्महत्या प्रकरणी तिचा कथित बॉयफ्रेंड सूरज पंचोलीला अटक करण्यात आली होती. सध्या सूरज जामिनावर बाहेर आहे. तेव्हापासून या प्रकरणी कोणतीही माहिती समोर आली नव्हती. तब्बल आठ वर्षांनी अखेर सत्र न्यायालयाने हे प्रकरण सीबीआय न्यायालयात वर्ग केल्याचं सांगितलं आहे.

यावरून प्रतिक्रिया देताना सूरज पांचोलीचे वकील प्रशांत पाटील म्हणाले, सत्र न्यायालयाने हे प्रकरण सीबीआय न्यायालयात वर्ग केल्याच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. हे प्रकरण लवकरात लवकर पुढे यावर सहा महिन्यांच्या आत निर्णय घ्यावा, अशी आम्ही यापूर्वी अनेकदा विनंती केली होती. आम्ही वेळोवेळी अर्ज केले आणि त्याचा स्विकारही करण्यात आला. परंतु हा प्रकरणात खूप उशिर झालाय. पण आता हे प्रकरण सीबीआय कोर्टात गेल्यामुळे तिथे अर्ज करून दैनंदिन आधारावर हा खटला चालवण्यासाठी अर्ज करू.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2021 7:57 pm

Web Title: jiah khan death case cbi court will now hear case pending for 8 years prp 93
Next Stories
1 प्रार्थना बेहेरेने फ्रेंडशीप डे निमीत्ताने लाँच केले गाणे!
2 ‘नॉन व्हेज सोडल्यानंतर श्रद्धा झाली जास्त फीट आणि…’, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
3 सुपर डान्सर चॅप्टर ४मध्ये शिल्पा शेट्टीच्या ऐवजी दिसणार रवीना टंडन?
Just Now!
X