01 October 2020

News Flash

सुरजला वाचवण्यासाठी सलमानने केले होते प्रयत्न; जिया खानच्या आईचा गंभीर आरोप

"जियाची केस बंद करण्यासाठी सलमान रोज CBI अधिकाऱ्यांना फोन करायचा"

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो केवळ ३४ वर्षांचा होता. सुशांतच्या आत्महत्येसाठी बॉलिवूडमधील घराणेशाहीला जबाबदार ठरवले जात आहे. तसेच घराणेशाहीचे कर्ताधर्ता म्हणून करण जौहर व सलमान खान यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशीही मागणी केली जात आहे. दरम्यान आता अभिनेत्री जिया खानच्या आईनेही सलमान खानवर निशाणा साधला आहे. जियाची केस बंद करण्यासाठी सलमान खानने प्रयत्न केले होते, असा धक्कादायक आरोप तिने केला आहे.

 

View this post on Instagram

 

Late Actress Jiah Khan’s Mother From London On NEPOTISM In Bollywood Issue . . . #sushantsinghrajput #jiahkhan #suicide #nepotism #bollywoodmovies

A post shared by Scuttlebutt (@bollywood.scuttlebutt) on

जियाची आई राबिया अमीन यांनी सुशांतच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी बॉलिवूडमधील घराणेशाहीवर टीका केली. शिवाय सलमान खानवरही गंभीर आरोप केले. २०१३ साली अभिनेत्री जिया खानने आत्महत्या केली होती. जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या संशयावरुन अभिनेता सुरज पांचोलीला अटक करण्यात आली होती. परंतु त्याला सोडवण्यासाठी सलमान खानने प्रयत्न केले होते असा आरोप जियाची आई राबिया अमीन यांनी केला आहे.

“सुशांतबाबत जी घटना घडली त्यामुळे मला २०१५ची आठवण झाली. तेव्हा मी माझ्या मुलीच्या केसच्या संदर्भात एका सीबीआय अधिकाऱ्याची भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी सांगितलं, की सलमान मला रोज फोन करुन सुरजला वाचवण्यासाठी विनंती करतोय. यासाठी तो पैसे देखील द्यायला तयार आहे. बॉलिवूडमधील हा बुलिंगचा प्रकार आता बंद व्हायलाच हवा.” असा अनुभव राबिया अमीन यांनी सांगितला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2020 3:58 pm

Web Title: jiah khan mother alleges salman khan tried to protect sooraj pancholi mppg 94
Next Stories
1 ‘तू मला फसवलंस’; सुशांतच्या मित्राची मन हेलावून टाकणारी पोस्ट
2 ‘तू सुंदर दिसतो’ म्हटल्यावर तैमुर झाला नाराज; मुलाखत घेणाऱ्या अँकरला म्हणाला…
3 करण जोहरकडे चाहत्यांनी फिरवली पाठ; २० मिनिटांत इतके लाख फॉलोअर्स झाले कमी
Just Now!
X