नाटक, हिंदी-मराठी चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, वेबमालिका अशी चौफे र मुशाफिरी करणारे अभिनेते जितेंद्र जोशी यांचा कलाप्रवास वेबसंवादातून जाणून घेता येणार असून ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ उपक्रमात त्यांच्याशी गप्पा मारता येतील.

मराठी चित्रपटांत खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिकांमधून जितेंद्र जोशी यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली आहेच, पण ‘सेक्रे ड गेम्स’मधील त्यांनी वठवलेली ‘काटेकर’ ही व्यक्तिरेखा जगभर गाजली. अभिनयाबरोबरच ते उत्तम सूत्रसंचालक आहेत. उत्तम कवी आहेत, गीतकार आहेत. या सगळ्या भूमिका पार पाडत ते सामाजिक बांधिलकीही जपतात. कलाविष्काराच्या नाना तऱ्हा अवगत असलेल्या या विलक्षण, बहुआयामी व्यक्तिमत्त्वाशी ‘लोकसत्ता’च्या व्यासपीठावर गप्पा मारता येतील. बुधवारी (१९ ऑगस्ट) सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होईल.

विविधांगी भूमिका..

‘मु. पो. बोंबिलवाडी’ या लेखक-दिग्दर्शक परेश मोकाशी यांच्या नाटकातून जितेंद्र शकुंतला जोशी यांचा कलासृष्टीतील प्रवास सुरू झाला. ‘हम तो तेरे आशिक है’, ‘नकळत सारे घडले’, ‘प्रेम नाम है मेरा’, ‘हमिदाबाईची कोठी’, ‘दोन स्पेशल’ या व्यावसायिक नाटकांतून त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. ‘लोकसत्ता संपादक शिफारस’ मिळालेल्या ‘दोन स्पेशल’ या नाटकाची निर्मितीही त्यांनी केली आहे. अनेक गुजराती नाटकांमधील त्यांच्या भूमिकाही गाजल्या आहेत.

सहभागी होण्यासाठी :  https://tiny.cc/LS_SahajBoltaBolta_19Aug   येथे नोंदणी आवश्यक.