05 April 2020

News Flash

शरद पवारांना आरे तुरे काय करता? जितेंद्र जोशी संतापला

सोशल मीडियावर एकेरी आणि अर्वाच्च भाषेत होणाऱ्या ट्रोलिंगवर जितेंद्रने संताप व्यक्त केला आहे

सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील जितेंद्र जोशीचा ‘दोन स्पेशल’ हा कार्यक्रम एकाच एपिसोडनंतर चर्चेत आहे. ‘दोन स्पेशल’ या कार्यक्रमात कलाकारांच्या आयुष्यातील जगासमोर न आली गुपिते समोर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. अभिनयाच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून त्यांच्या रोजच्या जगण्यातले अनुभव, त्यांची मते, त्यांचे विचार गप्पांच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न या कार्यक्रमात केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात अभिनेता सुबोध भावे व सुमीत राघवन या दोन मित्रांनी हजेरी लावली होती. या दोघांच्या आयुष्यातील बरेचसे किस्से कार्यक्रमात ऐकायला मिळाले.

दरम्यान कार्यक्रमात जितेंद्र जोशीने सोशल मीडियावर होणारा अरेरावी आणि एकेरी उल्लेखा बाबत चीड व्यक्त केली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत गाजलेला विषय म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्याच्या सभेत भर पावसात केलेले भाषण. सोशल मीडियावर हे भाषण चर्चेचा विषय ठरलेला होता. अनेकांनी शरद पवार यांच्या कृतीचे कौतुक केले. मात्र त्याचवेळी अनेकांनी खास करून विरोधकांनी त्यांना या विषयावरून ट्रोल सुद्धा करण्याचा प्रयत्न केला.

जितेंद्र जोशीने कार्यक्रमात ट्रोलर्समुळे आलेला वाईट अनुभव सांगितला आहे. शरद पवार यांचा पावसात भिजून भाषण देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा अनेकांनी ‘आरे’ ‘तुरे’ची भाषा वापरुन त्यांना ट्रोल केले. ‘मी शरद पवार यांचा पावसात भिजत भाषण देतानाचा फोटो पाहिला. त्याच्यावर लोकांनी खाली आरे, तुरे लिहित कमेंट केल्या होत्या. अनेक वर्षे, एका माणसाने काही काळ त्या क्षेत्रात घालवली आहेत. त्याच्या विषयी आदराने तरी बोला’ अशा शब्दात सोशल मीडियावर एकेरी आणि अर्वाच्च भाषेत होणाऱ्या ट्रोलिंगवर जितेंद्रने संताप व्यक्त केला आहे.

विधानसभा निवडणूकी दरम्यान शरद पवारांनी सातारा येथे सभा घेतली होती. दरम्यान तेथे अचानक पाऊ पडू लागला. मात्र शरद पवार यांनी न थांबता भाषण सुरु ठेवले. भर पावसात त्यांनी केलेल्या भाषणाची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली होती. त्यांचा हा उत्साह पाहून कार्यकर्तेही भारावून गेले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2019 11:24 am

Web Title: jitendra joshi speaks about disrespect of politician sharad pawar avb 95
Next Stories
1 ‘राधे’ आणि ‘लक्ष्मी बॉम्ब’ आमनेसमाने, सलमान-अक्षयमध्ये टक्कर
2 शाहरूखच्या चाहत्यांवर सौम्य लाठीमार
3 ओटीटीवरचे नवे गडी
Just Now!
X