25 January 2021

News Flash

‘चल लग्न करूया..’; जितेंद्र जोशीची पत्नीसाठी खास पोस्ट

जितेंद्रच्या या पोस्टवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

जितेंद्र जोशी, मिताली जोशी

नाटक, हिंदी-मराठी चित्रपट, मालिका, वेब सीरिज अशी चौफेर मुशाफिरी करणारा अभिनेता जितेंद्र जोशी याने सोशल मीडियावर पत्नीसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट लिहिण्यामागे तसं खास कारणसुद्धा आहे. ते कारण म्हणजे त्यांच्या लग्नाचा अकरावा वाढदिवस. आयुष्याच्या या नव्या प्रवासाची सुरुवात कशी झाली आणि हा प्रवास इथपर्यंत कसा पोहोचला याविषयी अगदी मोजक्या शब्दांत जितेंद्रने या पोस्टमधून सांगितलं आहे.

‘चल लग्न करूया.. अकरा वर्षांपूर्वी मध्यरात्री याच वेळी त्या दोघांना एकमेकांसोबत लग्न करायचंय, इतकंच माहित होतं. तो संभ्रमावस्थेत होता पण ती नव्हती. तिला काळजी वाटत होती पण त्याला नव्हती. आता अकरा वर्षांच्या लग्नानंतर.. यावेळी ती नाशिकमध्ये तिच्या दिग्दर्शनाच्या पदार्पणाचं काम करतेय आणि तो मुंबईत त्यांच्या मुलीची देखभाल करतोय. निर्माता म्हणून त्याचा पहिला लघुपट आणि दिग्दर्शक, लेखिका म्हणून तिचा पहिला लघुपट. याला मी सर्वांत आनंददायी लग्नाचा वाढदिवस म्हणेन’, असं म्हणत जितेंद्रने त्याचं प्रेम व्यक्त केलं. जितेंद्रच्या या पोस्टवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

मराठी चित्रपटांत खूप वेगवेगळ्या पद्धतींच्या भूमिकांमधून जितेंद्र जोशीने प्रेक्षकांची दाद मिळवली आहेच, पण ‘सेक्रेड गेम्स’मधील त्याने वठवलेली ‘काटेकर’ ही व्यक्तिरेखा जगभर गाजली. अभिनयाबरोबरच तो उत्तम सूत्रसंचालक, उत्तम कवी, गीतकार आहेत. या सगळ्या भूमिका पार पाडत तो सामाजिक बांधिलकीही जपतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 9:59 am

Web Title: jitendra joshi special post for his wife on 11th wedding anniversary ssv 92
Next Stories
1 ‘बिग बॉस मराठी 2’फेम अभिनेता अभिजीत केळकर करोना पॉझिटिव्ह
2 “आज देशाचं खूप मोठं नुकसान झालं”; प्रणव मुखर्जी यांना रितेश देशमुखने वाहिली श्रद्धांजली
3 “विवाह हा जीवनाचा एक भाग आहे; निवृत्ती नव्हे!”- पूजा बॅनर्जी
Just Now!
X