22 October 2019

News Flash

विसरभोळ्या शबाना आझमी, या पुरस्काराबद्दल आठवेना

हा पुरस्कार कोणत्या चित्रपटासाठी मिळाला होता

बॉलिवूडमध्ये सध्या आयफा पुरस्कारांचे वातावरण आहे. चाहते देखील यंदाच्या सर्वोत्कृष्ट कलाकारांना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. दरम्यान अभिनेत्री शबाना आझमी यांनी एका ट्विटच्या माध्यमातून काही जुन्या आठवणी ताज्या केल्या. शबाना आझमी यांनी अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या बरोबर काढलेला एक फोटो ट्विट केला आहे. “हा फिल्म फेअर पुरस्कार कोणत्या चित्रपटासाठी मिळाला होता हे मला आठवत नाही” असे ट्विट त्यांनी केले आहे.

या त्यांच्या ट्विटवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रीया देत हा पुरस्कार कोणत्या चित्रपटासाठी मिळाला होता हे ओळखून दाखवले आहे. शबाना व अमिताभ यांना अमर अकबर अँथोनी या चित्रपटासाठी फिल्म फेअर पुरस्कार मिळाला होता. त्या पुरस्कार सोहळ्यात काढलेला हा फोटो आहे.

अमर अकबर अँथोनी हा ७०च्या दशकातील सुपरहीट चित्रपट होता. या चित्रपटात शबाना आझमी यांनी लक्ष्मी ही व्यक्तिरेखा साकारली होती. तसेच अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, ऋषी कपूर, नीतू सिंग, निरुपा रॉय यांनी देखील चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनमोहन देसाई यांनी केले होते.

First Published on September 16, 2019 3:55 pm

Web Title: jitesh pillai shabana azmi amitabh bachchan filmfare awards mppg 94