12 July 2020

News Flash

”जितनी इज्जत कमाई है, वो सब निकल जाएगी”; अक्षयने का व्यक्त केली भीती?

आपल्या अभिनय कौशल्याच्या बळावर त्याने आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये प्रशंसनीय भूमिका साकारल्या आहेत.

अक्षय कुमार

विविध धाटणीच्या भूमिकांना रुपेरी पडद्यावर न्याय देण्यासाठी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार. आपल्या अभिनय कौशल्याच्या बळावर त्याने आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये प्रशंसनीय भूमिका साकारल्या आहेत. विनोदी म्हणू नका किंवा मग एखाद्या गंभीर विषयावरचं कथानक. प्रत्येक वेळी त्याने सर्वस्व पणाला लावून ते पात्र रुपेरी पडद्यावर उभं केलं आहे. गेल्या काही काळापासून सामाजिक विषयांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांची निवड करण्याकडेच त्याचा जास्त कल दिसून आला. सामाजिक विषयांसोबतच काही सत्यघटनाही त्याने तितक्याच समर्पकपणे मांडल्या. ज्यामध्ये, ‘एअरलिफ्ट’, ‘पॅडमॅन’, ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटांचा समावेश आहे. यात नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘मिशन मंगल’चंही नाव घेतलं जात आहे. ‘पॅडमॅन’पासून ‘मिशन मंगल’पर्यंतच्या भूमिका एकाच साच्यातील वाटू लागल्याने प्रेक्षकांना काही वेगळं पाहायला मिळेल का असा सवाल अक्षयला नुकतंच एका मुलाखतीत विचारलं गेलं.

या प्रश्नावर अक्षयची सहकलाकार विद्या बालन म्हणाली, ”याचा आगामी चित्रपट हाऊसफुल ४ हा पूर्ण साचाच बदलून टाकणार आहे.” याविषयी पुढे अक्षय म्हणाला, ”जितनी इज्जत कमाई है, वो सब निकल जाएगी हाऊसफुल ४ मै, (जितकी इज्जत कमावली आहे, ती सर्व हाऊसफुल ४मध्ये निघून जाईल).”

आणखी वाचा : राखी सावंत होणार आई?; शेअर केला ‘हा’ फोटो

‘हाऊसफुल ४’ हा कॉमेडी चित्रपट ‘हाऊसफुल’च्या फ्रँचाईजीमधील चौथा चित्रपट आहे. फरहान सामजी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून यातील भन्नाट कॉमेडी प्रेक्षकांना खळखळून हसवण्यास भाग पाडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2019 3:46 pm

Web Title: jitni izzat kamaayi hai woh sab nikal jaayegi housefull 4 mein says akshay kumar ssv 92
Next Stories
1 Video : पंचतारांकित हॉटेलच्या नाश्त्यात आढळल्या अळ्या; ‘कलंक’मधील अभिनेत्रीने उघड केला प्रकार
2 नेहाकडून चित्रपट व नाटक निर्मितीच्या योजना जाहीर
3 राखी सावंत होणार आई?; शेअर केला ‘हा’ फोटो
Just Now!
X