28 October 2020

News Flash

‘जोकर’ पुन्हा येतोय; दुसऱ्या भागासाठी खलनायकाला मिळणार तब्बल इतके कोटी

दुसऱ्या भागासाठी अभिनेत्याला मिळालेली ऑफर पाहून तुम्ही देखील चक्रावून जाल

‘जोकर’ हा हॉलिवूड सिनेसृष्टीतील आजवरच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. या चित्रपटात सुपरस्टार वॉकिंग फिनिक्स याने जोकरची व्यक्तिरेखा साकारली होती. तिकीट बारीवर अक्षरश: धुमाकूळ घालणाऱ्या या खलनायकपटाचा दुसरा भाग आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ‘जोकर २’ साठी वॉकिंग फिनिक्सला तब्बल ३६७ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे.

वॉकिंग फिनिक्सने आजवर कधीही एकाच फ्रेंचाईजीच्या मूव्ही सीरिजमध्ये काम केलेलं नाही. किंबहूना केवळ एकच चित्रपट करुन हा अभिनेता फ्रेंचाईजी सोडून देतो. परंतु जोकरसाठी मात्र त्याने आपला हा नियम मोडण्यास होकार दिला आहे. या चित्रपटात वॉकिंगने केलेल्या अभिनयाची प्रचंड स्तुती करण्यात आली. या भूमिकेसाठी त्याला ऑस्कर पुरस्काराने देखील सन्मानिक केलं गेलं. अखेर प्रेक्षकांच्या आग्रहाखातर आता तो जोकरच्या दुसऱ्या भागातही झळकणार आहे. सीबीएस न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार या भूमिकेसाठी त्याला तब्बल ३६७ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली आहे.

२००७ साली प्रदर्शित झालेल्या ‘द डार्क नाईट’ या चित्रपटामुळे जोकरला खरी प्रसिद्धी मिळाली होती. या चित्रपटात अभिनेता हिथ लेजर याने जोकर ही खलनायक व्यक्तिरेखा साकारली होती. या भूमिकेसाठी हिथला ‘ऑस्कर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तेव्हापासून चाहत्यांनी जोकरवरील एका स्टँड अलोन चित्रपटाची मागणी केली होती. चाहत्यांच्या आग्रहाखातर जोकरची निर्मिती करण्यात आली. ‘जोकर’ या चित्रपटाला भारतातही चांगला प्रतिसाद मिळाला. ‘जोकर’ प्रदर्शित झाला त्याच वेळी हृतिक रोशन व टायगरची श्रॉफ यांचा ‘वॉर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. परंतु त्याही परिस्थितीत ‘वॉर’ला टक्कर देत या चित्रपटानं तब्बल १३२ कोटी रुपयांची कमाई केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2020 2:37 pm

Web Title: joaquin phoenix return as joker offered rs 367 crore for sequels mppg 94
Next Stories
1 “बनावटी प्रचाराविरोधात मिळाला विजय”; उर्मिला मातोंडकर यांनी मानले चाहत्यांचे आभार
2 ‘रंगीला’ चित्रपटाच्या वेळी आमिर खान आठ दिवसांनी एकदा अंघोळ करायचा; कारण…
3 रॉनित रॉय होता आमिर खानचा बॉडीगार्ड; म्हणतो, “आजही लक्षात आहे ती शिकवण”
Just Now!
X