News Flash

एकताची ‘जोधा अकबर’ झी टीव्हीवर

दूरचित्रवाहिनीवर महामालिकांचा इतिहास रचणारी एकता कपूर आता ऐतिहासिक मालिकांच्या निर्मितीक डे वळली आहे. खास बालाजी टेलिफिल्म्सचा परीसस्पर्श असलेली ‘जोधा अकबर’ ही ऐतिहासिक मालिका लवकरच झी

| May 31, 2013 12:35 pm

दूरचित्रवाहिनीवर महामालिकांचा इतिहास रचणारी एकता कपूर आता ऐतिहासिक मालिकांच्या निर्मितीक डे वळली आहे. खास बालाजी टेलिफिल्म्सचा परीसस्पर्श असलेली ‘जोधा अकबर’ ही ऐतिहासिक मालिका लवकरच झी टीव्हीवर प्रदर्शित होणार आहे. मात्र, आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित जोधा अकबर या चित्रपटाशी मालिके चा काहीही संबंध नाही, दोन्हीच्या आशयांमध्ये फरक असल्याचे एकताने स्पष्ट केले आहे.
आशुतोष गोवारीकरच्या ‘जोधा अकबर’मध्ये अकबर आणि जोधाबाई यांची प्रेमकथा रंगवण्यात आली होती. एकताच्या ‘जोधा अकबर’मध्ये या प्रेमकथेला फाटा देण्यात आला आहे. ही मालिका बादशाह अकबर याच्या राजकीय प्रवासावर भर देणारी आहे.   जून महिन्यात ही मालिका झी टीव्हीवर प्रसारित होणार आहे. या मालिकेत बादशाह अकबराची भूमिका रजत टोकस तर परिधी शर्मा ही अभिनेत्री जोधाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अश्विनी काळसेकर महामांगाच्या भूमिकेत दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2013 12:35 pm

Web Title: jodha akbar serial by ekta kapur on zee tv
टॅग : Entertainment
Next Stories
1 वीस वर्षांपूर्वीचा ‘गोलपिठा’ पुन्हा रंगभूमीवर
2 जून्या गाण्यांचा गंध नव्या रूपात
3 धूम-३ चित्रपटाच्या उपग्रहाव्दारे प्रक्षेपण अधिकारांची ७५ कोटींना विक्री?
Just Now!
X