News Flash

टार्झनची भूमिका साकारणाऱ्या जो लारा यांचा विमान अपघातात मृत्यू

अपघातात पत्नीसह अन्य पाच प्रवाशांचा मृत्यू

९०च्या दशकातील लोकप्रिय अशा टार्झन टेलिव्हिजन मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार्‍या जो लारा यांच्यासह सात जणांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. जो लारा यांच्यासह त्यांची पत्नीदेखील होती. अमेरिकेच्या नॅशविले शहराजवळील तलावामध्ये त्यांचे विमान कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

शनिवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी ११ वाजता त्यांच्या विमानाने फ्लोरिडाच्या पाम बीच, टेमिनी विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच हा अपघात घडला.लहे विमान नॅशविलच्या दक्षिणेस १९ किलोमीटर असणाऱ्या पर्सी प्रिस्ट तलावामध्ये कोसळले. सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने विमानात सात जण होते.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर बचावकार्य सुरु करण्यात आलं. शनिवारी रात्रीपर्यंत शोध आणि बचावकार्य सुरु असल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर शनिवारी रात्री उशिरा पीडितांची ओळख पटवण्यात आली आहे. त्यानंतर रविवारी सापडलेल्या विमानाच्या अवशेषामध्ये मृतदेह सापडले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

(Photo: George Walker IV/The Tennessean via AP)

१९८९ साली आलेल्या टार्झन इन मॅनहॅटन या चित्रपटात लारा यांनी टार्झनची मुख्य भूमिका साकारली होती. नंतर १९९६ ते १९९७ दरम्यानच्या “टार्झन: द एपिक अ‍ॅडव्हेंचर” या मालिकेमध्ये भूमिका केली. त्यानंतर २००२ साली संगीतमध्ये करियर करण्यासाठी अभिनय न करण्याचे ठरवले.

लारा यांनी ग्वेन शॅम्बलिन लारा यांच्यासोबत २०१८ मध्ये लग्न केलं होतं. वेड डाउन मिनिस्ट्री नावाच्या एका संस्थेच्या त्या नेत्या होत्या. १९८९ मध्ये त्यांनी या संस्थेची स्थापना केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2021 9:46 am

Web Title: joe lara who plays tarzan dies in a plane crash abn 97
Next Stories
1 “मला स्पर्धकांचं कौतुक करण्यास सांगितलं गेलं”, इंडियन आयडल शोबद्दल सुनिधी चौहानचा मोठा खुलासा
2 राजकुमार रावकडून ‘करोना योद्ध्यां’ना अनोखी सलामी; शेअर केली खास कविता
3 बॉलिवूडचे बिग बी भडकले; घरात बदल केल्यामुळे बिग बींना झाला मोठा मनस्ताप
Just Now!
X