26 February 2021

News Flash

गुन्हेगारी विश्व पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर; जॉन अब्राहम-इमरान हाश्मी प्रमुख भूमिकेत

उद्या प्रदर्शित होणार या चित्रपटाचा टीझर

मुंबईतलं गुन्हेगारी विश्व अनेक चित्रपटांचा विषय बनलं आहे. ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’, ‘दगडी चाळ’ असे अनेक हिंदी मराठी चित्रपट या गुन्हेगारी विश्वावर बनलेले आहेत. आता पुन्हा एक नवीन चित्रपट येतोय ज्यात जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मी एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच समोर आली आहे.

‘मुंबई सागा’ हा गुन्हेगारी विश्वावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात अभिनेता जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मी हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १९ मार्चला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. १९८०-९० च्या दशकातलं गुन्हेगारी विश्व दाखवणारी ही कथा आहे. या चित्रपटाचं निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन संजय गुप्ता यांनी केलं आहे.


या चित्रपटात जॉन हा गणपत राम भोसले या मुंबईतल्या गुंडाची भूमिका साकारणार आहे तर इमरान यात पोलिसाच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटात सुनील शेट्टी, काजल अग्रवाल, जॅकी श्रॉफ, प्रतिक बब्बर आणि गुलशन ग्रोवर हेही कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचा टीझर उद्या प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशीच अर्जुन कपूर आणि परिणिती चोप्रा यांचा ‘संदीप और पिंकी फरार’ हाही चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता कोणत्या चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे तेव्हाच कळेल. इमरानचा अजून एक चित्रपट येत्या ३० एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. ‘चेहरे’ या रहस्यपटात तो अमिताभ बच्चन यांच्यासोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2021 6:27 pm

Web Title: john abraham and emran hashmi starrer gangster drama mumbai saga to be released vsk 98
Next Stories
1 दुसऱ्या बाळाला जन्म दिल्यानंतर करीनाने केली पहिली पोस्ट…
2 ‘हसण्यासोबतच घाबरण्यासाठी तयार रहा’; भूत पोलिस येत आहे!
3 करीना रुग्णालयातून परतली घरी; समोर आला व्हिडीओ
Just Now!
X