News Flash

‘मुंबई सागा’ सिनेमाचा टीझर रिलीज, जॉन अब्राहम आणि इम्रानचा अ‍ॅक्शन धमाका

19 मार्चला 'मुंबई सागा' चित्रपटगृहात धडकणार

जॉन अब्राहम आणि इमरान हाश्मीचा अ‍ॅक्शन पॅक असलेल्या ‘मुंबई सागा’ या सिनेमाचा टीझर रिलीज झालाय. सोबतच सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलीय. येत्या 19 मार्चला ‘मुंबई सागा’ चित्रपटगृहात धडकणार आहे.
जॉन अब्राहम आणि इमारानसोबतच या सिनेमात अनेक बडे स्टार झळकणार आहेत. काजल अग्रवाल या अभिनेत्रीसह प्रतिक बब्बर, जॅकी श्रॉफ, महेश मांजरेकर, अमोल गुप्ते, सुनील शेट्टी, गुलशन ग्रोवर असे बडे स्टार मुख्य भूमिकेत झळकतील. संजय गुप्ता यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय.

जॉन अब्राहमने सोशल मीडियावर सिनेमाचा टीझर शेअर केलाय. “जेव्हा बॉम्बे मुंबई नव्हती आणि रस्त्यांवर हिंसेचं राज्य़ होतं!” असं कॅप्शन जॉनने टीझरला दिलं आहे. या सिनेमात जॉन पुन्हा एकदा एका गुंडाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर इमरान हाश्मी पोलिसाच्या भूमिकेत पाहायला मिळेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by John Abraham (@thejohnabraham)

‘मुंबई सागा’ या सिनेमात मुंबईतील गँगवॉर पाहायला मिळेल. टीझर वरुनच सिनेमात धडाकेबाज अ‍ॅक्शन पाहायला मिळणार याचा अंदाज येतोय. धूम, मद्रास कॅफे, सत्यमेव जयते, फोर्स अशा सिनेमांमध्ये जॉन अब्राहमची अ‍ॅक्शन पाहायला मिळाली आहे. जॉन ‘अ‍ॅटक’ या सिनेमाच्या शूटींगमध्ये सध्या व्यस्त आहे. तर दुसरीकडे इमरान हाश्मीनेदेखील त्याच्या ‘चेहरे’ सिनेमाचं पोस्टर शेअर करत प्रदर्शनाची तारीख जाहीर केलीय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2021 2:04 pm

Web Title: john abraham and imarn hashmis mumbai saga movie teaser out anthor action pack kpw 89
Next Stories
1 “त्या दोघांमुळे मी आव्हान स्वीकारु शकलो”; अभिनय क्षेत्रातील पदार्पणावर सोहम व्यक्त
2 नवाजने सुपस्टार विजय सोबत काम करण्यास दिला नकार?
3 ‘त्या’ घटस्फोट सोहळ्याचे रहस्य आले सर्वांसमोर
Just Now!
X