19 September 2020

News Flash

जॉन अब्राहम घेऊन येतोय एक नवा थरारपट

या चित्रपटाचे शूटिंग डिसेंबर २०१९ मध्ये सुरु होणार आहे असे सांगण्यात येत आहे.

जॉन अब्राहम

अॅक्शन- थ्रिलर चित्रपट म्हटलं की बॉलिवूडमधील ठराविक कलाकार डोळ्यांसमोर येतात. यामध्ये अभिनेता जॉन अब्राहमचे नाव प्रामुख्याने समोर येते. अभिनेता जॉन अब्राहमचा ‘बाटला हाऊस’ हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. नुकतीच जॉनने त्याच्या नव्या चित्रपटाचीही घोषणा केली आहे. हा चित्रपट अॅक्शन- थ्रिलर असणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘अटॅक’ असणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्य राज आनंद करणार आहेत. चित्रपटाची निर्मिती धीरज वाधवान, अजय कपूर आणि जॉनची प्रोडक्शन कंपनी करणार आहे.

“माझ्या प्रोडक्शन कंपनीमध्ये मी सगळ्यात आधी चित्रपटाचे कथानक बघतो. ‘अटॅक’ हा एक थरारपट आहे. मला असे चित्रपट करायला कायमच आवडतं. धीरज आणि अजयसुद्धा माझ्यासोबत या चित्रपटावर काम करत आहेत याचा मला आनंद आहे.” असे जॉन म्हणाला. सत्य घटनांपासून प्रेरित झालेली पण काल्पनिक अशी या चित्रपटाची कथा आहे.

या चित्रपटाचे शूटिंग डिसेंबर २०१९ मध्ये सुरु होणार आहे असे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी ‘बाटला हाऊस’चा टिझर प्रदर्शित झाला. वादविवादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याची ही गोष्ट आहे. यामध्ये जॉन पोलीस अधिकारी संजय कुमार यादव यांची भूमिका साकारणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2019 3:47 pm

Web Title: john abraham attack movie bollywood djj 97
Next Stories
1 कोण आहेत दत्तगुरुंचे पहिले गुरु?
2 या कारणामुळे शाहरुखला परत करावं लागलं ‘द लायन किंग’साठी डबिंग
3 चित्रपट न आवडल्याने रितेशने चाहत्याला परत दिले पैसे, पहा ट्विट
Just Now!
X