बॉलिवूड अभिनेत्यांकडे महागड्या आणि लग्झरी गाड्यांचे कलेक्शन असणे हे काही नवीन नाही. या कलाकारांच्या यादीमध्ये अभिनेता जॉनचा देखील समावेश आहे. पण जॉनला बाइकचे वेड आहे. काही दिवसांपूर्वी त्याचे बाइक केलेक्श पाहायला मिळाले होते. आता अभिनेता अर्शद वारसीला देखीव बाइक आवडत असल्याचे समोर आले आहे. नुकताच जॉनने अर्शदला BMWची महागडी बाइक गिफ्ट दिली आहे.

जॉनने अर्शदला १२ लाखांची BMW F750 GS ही बाइक गिफ्ट म्हणून दिली आहे. एका मुलाखतीमध्ये अर्शदने हा खुलासा केला आहे. गिफ्ट देण्यापूर्वी जॉनने मला कोणती बाईक आवडते असा प्रश्न विचारला होता. सुरुवातीला मला असे वाटले की जॉन त्याच्या बाइक कलेक्शनमध्ये आणखी एक बाइक अॅड करणार. पण नंतर त्याने तिच बाइक मला गिफ्ट म्हणून दिली असे अर्शद म्हणाला.

जॉनने दिलेल्या या गिफ्टला अर्शदने घेण्यास नकार दिला होता. पण तोपर्यंत जॉनने ही बाइक अर्शदच्या घरी पाठवून दिली होती.

काही दिवसांपूर्वी अर्शदने बाइकिंग बंद केले होते. ‘काबुल एक्सप्रेस’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान जॉनने अर्शदला बाइकिंग का बंद केले असा प्रश्न विचारला होता. पत्नी मारिया गोरेटीला बाइकिंग आवडत नसल्यामुळे मी बाइकिंग बंद केले आहे असे उत्तर अर्शदने दिले. पण आता अर्शद पुन्हा बाइक चालवताना दिसत आहे.