31 October 2020

News Flash

‘सत्यमेव जयते 2’ चं पोस्टर पाहून नेटकऱ्यांनी डागलं टीकास्त्र; म्हणाले…

पाहा, 'सत्यमेव जयते 2' चं पोस्टर पाहून नेटकरी काय म्हणतात...

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम लवकरच ‘सत्यमेव जयते 2’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. काही दिवसापूर्वी या चित्रपटातील जॉनचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला असून त्याने सोशल मीडियावर हे पोस्टर शेअर केलं होतं. मात्र हे पोस्टर पाहिल्यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल केलं आहे. या पोस्टरचं एडिटींग चांगलं नाही असं म्हणत अनेकांनी जॉनवर टीका केली आहे.

‘सत्यमेव जयते’ या चित्रपटाच्या यशानंतर जॉनचा ‘सत्यमेव जयते 2’ हा चित्रपटदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटाचं नवीन पोस्टर प्रदर्शित झालं. या पोस्टरवर ‘जिस देश की मैया गंगा है, वहाँ खून भी तिरंगा है’, असं लिहिण्यात आलं आहे. हे पोस्टर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी टीकास्त्र डागलं आहे. ‘पोस्टरचं एडिटींग योग्य केलं नाही’, असं एकाने म्हटलं आहे. तर ‘जॉनचा लूक चांगला आहे. मात्र, एडिटींग योग्य नाही’, असं अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

दरम्यान, या चित्रपटाचं दिग्दर्शन मिलाफ झवेरी करत असून लखनौमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात येत आहे. हा चित्रपट १२ मे २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 3:53 pm

Web Title: john abraham got trolled on social media after he shared poster of his upcoming film satyamev jayate 2 ssj 93
Next Stories
1 येत्या रविवारी होणार ‘फत्तेशिकस्त’ सिनेमाचा प्रिमियर
2 उषा नाडकर्णी यांनी ‘माहेरची साडी’मधील आठवणी सांगत आशालता यांना वाहिली श्रद्धांजली
3 ‘आशाताई आम्हाला पोरकं करून गेल्या’; सुबोध भावे भावूक
Just Now!
X