News Flash

या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार ‘मुंबई सागा’ चित्रपट

जाणून घ्या कुठे...

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम आणि इम्रान हाश्मी यांचा ‘मुंबई सागा’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. अॅक्शनचा भरणा असणारा हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहामध्ये खेचण्यात अयशस्वी ठरल्याचे पाहायला मिळाले होते. आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

जॉन आणि इम्रानचा ‘मुंबई सागा’ हा चित्रपट २७ एप्रिल म्हणजेच आज पासून अमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. भारतासह २४० देशांमधील ऑमेझॉन प्राइम सदस्यांना तो पाहायला मिळणार आहे.

‘मुंबई सागा’ हा अॅक्शन ड्रामा अमर्त्य राव (जॉन अब्राहम) आणि सीनियर इंस्पेक्टर विजय सावरकर (इमरान हाशमी) यांच्यामधील द्वंद्वाची एक काल्पनिक कहाणी आहे. जी 90 च्या दशकातील मुंबईच्या पार्श्वभूमीवर स्थापित आशा-आकांक्षा, मित्रता आणि विश्वासघात अशा विभिन्न पैलूंना स्पर्श करते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मुंबई सागा तेव्हा असणाऱ्या बॉम्बे आणि आज बनलेल्या मुंबईची कहाणी आहे.

जॉन अब्राहम आणि इम्रान हाश्मी यांचा ‘मुंबई सागा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय गुप्ताने केले आहे. या चित्रपटात जॉन आणि इम्रानसोबत काजल अग्रवाल, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, प्रतीक बब्बरस रोनित रॉय, गुलशन ग्रोवर आणि अमोल गुप्ते हे कलाकार देखील आहेत. या चित्रपटाचे बजेट ६० कोटी रुपये असल्याचे म्हटले जात होते. हा चित्रपट २१०० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2021 7:01 pm

Web Title: john abraham imran hashmi mumbai saga movie on amazon prime avb 95
Next Stories
1 “वृत्तवाहिन्या नरेंद्र मोदी सोडून सगळ्यांच्या मुलाखती कशा घेऊ शकतात?” – राम गोपाल वर्मांचा सवाल!
2 भावाच्या हत्येप्रकरणी अभिनेत्रीला अटक
3 मालदीवला गेलेले लव्ह बर्ड्स मुंबईत परतले; नेटकऱ्यांनी विचारलं कशी होती ट्रीप ?
Just Now!
X