News Flash

‘वेदनम’च्या रिमेकमध्ये दिसणार जॉन अब्राहम?

हा चित्रपट 'वेदनम' या तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम सध्या त्याचा आगमी चित्रपट ‘बाटला हाऊस’च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. याव्यतिरिक्त जॉन ‘सत्यमेव जयते २’ आणि ‘पागलपंती’ चित्रपटाची देखील तयारी करत आहे. आता जॉनला आणखी एक चित्रपट मिळाल्याचे समोर आले आहे.

२०१५मध्ये प्रदर्शित झालेला तमिळ चित्रपट ‘वेदलम’चा हिंदी रिमेक येत आहे. या रिमेकमध्ये जॉन अब्राहम काम करणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच जुन्या तमिळ चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार अमित कुमार मुख्य भूमिकेत दिसला होता. तसेच या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार करणार असून त्यांनी या चित्रपटाचे हक्क देखीव विकत घेतले असल्याचे म्हटले जात होते. जॉनने या चित्रपटात काम करण्यास होकार दिला आहे. परंतु चित्रपटाचे दिग्दर्शन कोण करणार हे अद्याप गुलदसत्यामध्ये ठेवण्यात आले आहे.

‘वेदनम’ या तमिळ चित्रपटात अमितने टॅक्सी चालकाची भूमिका साकारली आहे. तो त्याच्या बहिणीसोबत कोलकातामध्ये राहत असतो. तसेच श्रृती हसनने या चित्रपटात एका वकिलाची भूमिका साकारली आहे. आता चित्रपटाच्या या रिमेकमध्ये जॉनला पाहण्यासाठी उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटात कोणते कालाकार दिसणार हे अद्याप समोर आलेले नाही.

जॉनचा ‘बाटला हाऊस’ हा चित्रपट २००८ साली दिल्लीतील चकमक प्रकरणावर आधारलेला आहे. तसेच हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2019 12:00 pm

Web Title: john abraham is star in tamil movie vedalam avb 95
Next Stories
1 ‘झुंड’साठी असा जुळून आला बिग बी व नागराज मंजुळेंचा योग
2 Happy Birthday kirron Kher : …अन् सुरु झाली अनुपम- किरण यांची लव्हस्टोरी
3 ‘बॉर्डर’ची २२ वर्षे: जाणून घ्या या चित्रपटाबद्दलच्या १५ भन्नाट गोष्टी
Just Now!
X