News Flash

“अरे, तुझे कपडे कुठे गेले?” चाहत्यांचा जॉनला सवाल

जॉन म्हणतो, “मी कपाटाची वाट पाहतोय…..”

संग्रहित

अभिनेता जॉन अब्राहम आपला फिटनेस आणि लूक्स यामुळे कायमच चर्चेत असतो. आजही सकाळी सकाळी त्यानं त्याच्या चाहत्यांना एक सरप्राईज दिलं आहे. आता ह्या सरप्राईजनं तर इंटरनेटचा ताबाच घेतला आहे.

जॉनने त्याचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

या फोटोत जॉन सोफ्यावर बसला आहे तेही कपडे न घालता!

त्याने आपल्या मांडीवर उशी ठेवली आहे आणि तो कॅमेऱ्याकडे बघून हसत आहे. या फोटोला त्याने कॅप्शन दिलं आहे की, “मी कपाटाची वाट बघतोय..#setlife”

 

View this post on Instagram

 

A post shared by John Abraham (@thejohnabraham)

जॉनचे ऍब्स, मसल्स पाहून चाहत्यांना हा फोटो लाईक करण्याचा मोह आवरला नसणार एवढं नक्की! त्याच्या चाहत्यांनी त्याच्या या फोटोजवर अगदी वाचण्याजोग्या आणि धम्माल कमेंट्स केल्या आहेत. एकाने कमेंट केली आहे की, “अरे भाई, कपडे?” तर दुसरा चाहता म्हणत आहे की, “कदाचित दोस्ताना २ ची शूटिंग सुरु झाली आहे”.

काही फॅन्सना तर ही उत्सुकता लागून राहिली आहे की, हा फोटो कोणी काढला आहे?

आय लव्ह यू, हॉट, फायर इमोजी, लाल बदाम अशा अनेक कमेंट्स या फोटोवर होत आहेत. थोडक्यात काय, जॉनची सध्या हवा सुरु आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by John Abraham (@thejohnabraham)

या आठवड्यात जॉनने ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. त्यानेच आपल्या एका पोस्टमधून या बद्दलची माहिती दिली होती. मोहित सुरीचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात दिशा पटनी, तारा सुतारिया आणि अर्जुन कपूर हे कलाकारही आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2021 12:54 pm

Web Title: john abraham posted a photo that shook the instagram vsk 98
टॅग : John Abraham
Next Stories
1 भूमीने शेअर केले सुशांतचे फोटो; जुन्या आठवणींना उजाळा
2 दीपिका पदूकोणचं डेली रुटीन काय असेल? चला जाणून घेऊया
3 राहुल गांधींनी स्वीकारलं पुशअप्स चॅलेंज, स्वरा भास्कर म्हणाली…
Just Now!
X