27 November 2020

News Flash

जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते २’ चित्रपटातील जबरदस्त लूक, चाहते फिदा

ईदला रिलीज होणार चित्रपट

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने काही दिवसांपूर्वी ‘सत्यमेव जयते’ चित्रपटाच्या सिक्वेलसाठी ‘हल्क’सारखा लूक अपेक्षित असल्याचं सांगत एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये हल्कला जॉन अब्राहमचा फोटो लावण्यात आला होता. त्यानंतर आता जॉन अब्राहमने चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं त्याची शरीरयष्टी पाहून चाहते फिदा झाले होते. आधीच्या चित्रपटाप्रमाणे सिक्वेलमध्येही देशभक्तीवर आधारित कथा असल्याचं पोस्टवरुन स्पष्ट दिसत आहे.

जॉन अब्राहमने सोशल मीडियावर चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. पोस्टरवर चित्रपटाची कथा थोडक्यात सांगणारा “जिस देश की मैय्या गंगा है, वहाँ खून भी तिरंगा है” हा डायलॉग देण्यात आला आहे.

मिलाप झवेरी यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. याआधी जॉनने हल्कचा पोस्टर शेअर करत मिलाप झवेरी यांना असणारी अपेक्षा सांगितली होती.

 

View this post on Instagram

 

Benchmark set by @milapzaveri . Work cut out for me during this break. #seeyouatthemovies #satyamevajayate2 #staysafeindia

A post shared by John Abraham (@thejohnabraham) on

जून महिन्यात चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. जॉनने पोस्टर शेअर करताना चित्रपट पुढील वर्षी ईदला १२ मे २०२१ ला रिलीज होणार असल्याची माहिती दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2020 6:56 pm

Web Title: john abraham releases satyameva jayate 2 poster sgy 87
Next Stories
1 “महान राष्ट्रीय नेत्या कंगना रणौत यांच्या सांगण्याप्रमाणे…”; माजी केंद्रीय मंत्र्याचा टोला
2 अनुरागवरील लैंगिक शोषणाच्या आरोपावर पूर्वाश्रमीच्या पत्नींनी दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या….
3 ड्रग्स प्रकरणी सारा, रकुल आणि श्रद्धा कपूर अडचणीत?, समन्स बजावले जाण्याची शक्यता
Just Now!
X