अभिनेता जॉन अब्राहम गेल्या काही वर्षांपासून एकाच साच्यातल्या भूमिका साकारताना दिसत आहे. विनोदी किंवा रोमँटीक भूमिका साकारलेल्या जॉननं मात्र गेल्या तीनएक वर्षांत फक्त ठराविक आणि एकाच साचातल्या भूमिका निवडल्या. ‘मद्रास कॅफे’, ‘फोर्स’, ‘फोर्स २’, ‘ढिशूम’, ‘परमाणू’, यांसाख्या चित्रपटात त्यानं त्याच साचेबद्ध भूमिका केल्या. १५ ऑगस्टच्या निमित्तानं जॉनचा ‘सत्यमेव जयते’ हा चित्रपटदेखील प्रदर्शित झाला. अनेक समीक्षकांची या चित्रपटास नापसंती मिळाली मात्र असं असलं तरी बॉक्स ऑफिसवर आश्चर्यकारकरित्या कमाई हा चित्रपट करत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या चित्रपटानं पहिल्याच दिवशी २०. ५२ कोटींची कमाई केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे. मुंबईसारख्या शहरात खुलेआम वावरणाऱ्या भ्रष्ट पोलिसांच्या अचानक हत्या होऊ लागतात. या हत्यांचा छडा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी लावतो साधरण अशा कथानकावर हा चित्रपट आधारलेला आहे.

मात्र जॉनच्या ‘सत्यमेव जयते’ला समीक्षांकडून चांगला प्रतिसाद लाभला नाही. ‘सत्येमव जयते’सोबत अक्षयचा ‘गोल्ड’ही प्रदर्शित झाला त्यामुळे जॉनसमोर मोठं आव्हान होतं. मात्र समीक्षकांची नकारात्मक प्रतिक्रिया लाभूनही प्रेक्षकांना आकर्षित करण्यास हा चित्रपट यशस्वी झाला आहे. जॉनच्या खचितच एखाद्या चित्रपटानं यापूर्वी इतकी मोठी कमाई केली असेल असंही म्हणत अनेकांनी प्रशंसा केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: John abraham satyameva jayate box office collection day
First published on: 16-08-2018 at 15:48 IST