News Flash

मुव्ही रिव्ह्यू- फोर्स २ : अ‍ॅक्शन अ‍ॅक्शन अ‍ॅक्शन

तसेच प्रणयदृश्यांना जरादेखील वाव दिलेला नाही हेही विशेषच

फोर्स २ चा पहिल्या चित्रपटाशी नावाव्यतिरिक्त कसलाच संबंध नाही.

काही लक्षवेधी जाहिरातपटाकडून अभिनय देवने “गेम “च्या दिग्दर्शनातून चित्रपट क्षेत्रात पुढचे पाऊल टाकले. पण “दिल्ली बेल्ली ” (२०११) या आजच्या युवा पिढीची भाषा मांडणाऱ्या चित्रपटाला चांगले यश मिळाले. त्यानंतर दिग्दर्शक म्हणून तो आता “फोर्स २ ” हा चित्रपट घेऊन आपल्यासमोर आला आहे. “फोर्स ” चे दिग्दर्शन निशिकांत कामतचे होते. पण फोर्स २ चा पहिल्या चित्रपटाशी नावाव्यतिरिक्त कसलाच संबंध नाही. या चित्रपटाची अगदीच थोडक्यात ओळख करून द्यायची तर संपूर्ण चित्रपटभर विदेश दर्शन व थरारक अ‍ॅक्शन दृश्ये आहेत. कधी कधी तर वाटते की हेच दाखवण्यासाठीच निर्माता विपुल अमृतराव शहा याने या चित्रपटाची खर्चिक निर्मिती केली असावी. शांघाय,  बुडापेस्ट येथे हा चित्रपट घडतो. ‘रॉ’ या भारतीय गुप्तचर यंत्रणेतील चौघांची चीनमध्ये हत्या करण्यात येते आणि चित्रपटाला सुरुवात होते. त्यासाठी मुंबईतील कर्तबगार पोलीस इन्स्पेक्टर यशवर्धन  (जॉन अब्राहम)  व रॉची हुशार अधिकारी केके  ( सोनाक्षी सिन्हा)  बुडापेस्टला जातात व या एकूणच प्रकरणाचा जोरदार तपास सुरु करतात. त्यात त्यांना त्या हत्या प्रकरणातील मूळ सूत्रधार शिव शर्मा  ( ताहिर राज भसीन)  सापडतो. आणि मग गाड्या,  हेलिकॉप्टर वगैरेचा थरारक पाठलाग व जोरदार मारधाड दृश्ये सुरु होतात.

शिव शर्मा नेमका कोण असतो, तो या हत्या का करतो, यात आणखीन कोणी सामिल आहेत का हे म्हणजेच चित्रपटाचा उत्तरार्ध होय. संपूर्ण चित्रपटात बुडापेस्टचे सुखद दर्शन घडते हे विशेष. तसेच प्रणयदृश्यांना जरादेखील वाव दिलेला नाही हेही विशेषच. संकलक अमिताभ शुक्ला व संजय शर्मा यांनी चित्रपटाची गती उत्तम ठेवलीय. मोहन कृष्णच्या छायाचित्रणाला दाद द्यायलाच हवी. जॉन अब्राहम अगदीच सहजी भूमिका साकारतो. सोनाक्षीनेही आपण अ‍ॅक्शन दृश्ये चांगलीच साकारू शकतो हे सिद्ध केलेय. ताहिर राज भसिन अतिशय थंडपणे वावरतो म्हणूनच त्याचा परिणाम जास्त पडतो. अभिनय देव कडून अधिक सकस व सरस चित्रपटाची अपेक्षा आहे.
श्रेणी ३ * – दिलीप ठाकूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 10:27 am

Web Title: john abraham sonakshi sinha force 2 movie review
Next Stories
1 आर्थिक परीक्षेच्या काळातही ‘व्हेंटिलेटर’ची कोट्यवधींची कमाई
2 मुव्ही रिव्ह्यूः न पटलेला ‘कौल’
3 फ्लॅशबॅक : ‘पोस्टर’ चित्रपट प्रसिध्दीचा आत्मा
Just Now!
X