15 July 2020

News Flash

वर्णद्वेष आंदोलन: अभिनेत्यावर पोलिसांचा हल्ला; व्हिडीओ होतोय व्हायरल

आंदोलन करणाऱ्या अभिनेत्याची पोलिसांनी तोडली बाईक

पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा संबंध अमेरिकेतील वर्णव्देशाशी जोडला जात आहे. परिणामी कृष्णवर्णीय लोकांनी प्रशासनाविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनाला इतर सेलिब्रिटींसोबतच अभिनेता जॉन क्युसेक याने देखील पाठिंबा दर्शवला आहे. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी त्याच्यावर हल्ला केला, असा आरोप त्याने केला आहे.

जॉर्ज फ्लॉइडच्या संशयास्पद मृत्यूमुळे कृष्णवर्णीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यांनी आपला राग व्यक्त करण्यासाठी थेट व्हाईट हाऊससमोर जाऊन निदर्शनं केली. दरम्यान जॉन क्युसेक बाईकवरुन या आंदोलनाचे चित्रीकरण करत होता. परंतु पोलिसांनी त्याच्यावर हल्ला केला. त्याच्या बाईकची तोडफोड केली. असा आरोप त्याने केला आहे. आपला आरोप सिद्ध करण्यासाठी त्याने ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूमुळे अमेरिकेत वातावरण पेटलं आहे. लोक करोना विषाणूची पर्व न करता रस्त्यांवर येऊन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात घोषणा देत आहेत. या आंदोलनाला शकिरा, टेलर स्विफ्ट, मडोना, लेडी गागा यांसारख्या अनेक मोठ्या हॉलिवूड कलाकारांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच काही सेलिब्रिटींनी तर नोव्हेंबरमध्ये तुम्हाला मतदानच करणार नाही अशी धमकीच द्यायला सुरुवात केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 2:20 pm

Web Title: john cusack claims he was attacked by police for documenting george floyd protests mppg 94
Next Stories
1 वर्णद्वेषाविरोधात आंदोलन सुरु; ऑस्कर ते नेटफ्लिक्स अनेकांनी असा नोंदवला निषेध
2 लॉकडाउनमध्येच ‘वैजू नंबर १’ मालिकेतल्या अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ
3 ‘पाताल लोक’ आणि ‘सेक्रेड गेम्स’च्या तुलनेबाबत अनुष्का शर्मा म्हणते…
Just Now!
X